मयूर जोशी
पिक्सेल म्हणजे काय? अमुक एक मेगापिक्सेलचा कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे असे म्हणत असतो. कंपनीदेखील अशीच ऍडव्हर्टाईस करत असतात की आमच्या मोबाईलचा कॅमेरा 100 मेगापिक्सेल आहे.
लहान मुलांचा खेळण्यासाठी ठोकळे एकत्र लावून चित्र तयार करण्याचा गेम असतो. समजा 10 ठोकळे एकत्र ठेऊन मी त्याचा फोटो तयार केला. तर त्याला 10 पिक्सेल चा फोटो म्हणता येईल. कारण ते दहा चौरस(square) असतील. त्या हिशोबाने खालील फोटोला मी 25 पिक्सेल चा फोटो आहे असे सांगेन. कारण हा फोटो 25 चौरस ठेवून तयार करण्यात आलेला आहे. आता 1 मिलियन (दहा लाख) चौरस एकत्र करून फोटो तयार केला तर त्याला एक मेगापिक्सेल असे म्हंटले जाते.
थोडक्यात डिजिटल कॅमेऱ्यामध्ये मग तो मोबाईलचा असो किंवा डीएस्एल्आरचा, त्यात सेन्सर असतो. तो सेन्सर 1 मेगा पिक्सेल किंवा 10 मेगापिक्सेलचा बनलेला असतो. म्हणून जेव्हा आपण फोटो काढतो त्या वेळेला त्या सेन्सर वर पडणारा लाईट हा त्या सेंसरचे जितके मेगापिक्सेल असतील तेवढ्या चौरस यामुळे तो फोटो तयार करतो. त्यासाठी खाली तयार केलेली आकृती बघून लक्षात येईल.
आता विचार करा ज्या सेन्सरवर हा लाईट पडत आहे तो समजा फक्त 14mm x 20mm साईज चा आहे. म्हणजे 1.5 cm x 2 cm साईज चा आहे. कारण मोबाईलमधील सेन्सर शक्यतो या साईजमध्ये असतात. आणि डीएस्एलआर वरील सेन्सरचा साइज मात्र मोबाईलपेक्षा तिप्पट-चौपट मोठा असू शकतो. त्यामुळे आकाराने छोटा सेन्सर तुम्ही 15 MPने तयार केला आणि मोठा सेन्सर देखील 15 MPने तयार केला तर मोबाईल सेन्सरवरील एक चौरस हा डीएसएलआर वरील एका चौरसापेक्षा खूप छोटा असेल. खालील आकृती बघून जास्त लक्षात येईल.
म्हणजेच डीएस्एल्आर वरील पिक्सेलचा आकार हा मोबाईल वरील पिक्सेलपेक्षा खूप मोठा असतो त्यामुळेच डीएसएलआर वरील चित्र जास्त स्पष्ट व जास्त चांगल्या पद्धतीचे दिसते. म्हणजेच कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे याच्यापेक्षा त्या कॅमेराचा सेंसर कोणत्या साईझचा आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. हे यातून शिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे फक्त 100 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे किंवा खूप जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे म्हणून तो चांगला हे पूर्ण चुकीचे विधान आहे. माझा डीएस्एल्आर फक्त बावीस मेगापिक्सेलचा आहे. आणि माझा मोबाईल 100 मेगापिक्सेलचा परंतु दोघांच्या दर्जात प्रचंड फरक पडतो तो सेन्सर साईझमुळे पडतो. सेन्सरचा आकार मोठा होत जातो तशी कॅमेऱ्याची किंमत वाढत जाते. याच विषयाला धरून याच्या पुढील लेख असणार आहे तो म्हणजे कॅमेरा व त्याचे प्रकार.
तूर्तास थांबतो.
तूर्तास थांबतो.
#mayurthelonewolf
(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)
ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999