Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल परबांविरोधात एवढ्या महिन्यांनंतर आताच कारवाई का?

May 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Anil Parab

मुक्तपीठ टीम

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आरोपांच्या फैरी खूप आधीपासून झाडायला सुरुवात केली. पण कारवाईसाठी आताचा मुहूर्त निवडला, यामागे भाजपाने प्रतिष्ठेची केलेली मुंबई मनपाची निवडणूक असल्याचं बोललं जातं. अनिल परब हे शिवसेनेची मुंबईतील स्थानिक रणनीती ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळेच त्यांना मनपा निवडणुकीपूर्वी कायदेशीर कारवाईत गुंतवलं गेल्यानं शिवसेनेला फटका बसेल, असं मानलं जातं.

अनिल परब शिवसेनेचे मातब्बर नेते-

  • अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे समजले जातात.
  • अनिल परब यांची मुंबईतील वॉर्ड निहाय समीकरणावर विशेष पकड आहे.
  • मुंबई मनपा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या रणनीतीमध्ये परब यांची मोठी भूमिका असते. २०१७ मध्ये मुंबई मनपाची निवडणूक शिवसेनेने जिंकली. या निवडणुकीच्या विजयात अनिल परब यांचा मोठा वाटा होता.
  • अनिल परब यांना पक्षाकडून २०१२ मध्ये विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते.
  • त्याआधी वांद्रे येथील पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करण्यात परब यांची मोठी भूमिका होती.
  • परब हे २०१७ मध्ये शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते झाले होते.
  • त्यानंतर त्यांना पक्षाने पुन्हा २०१८ मध्ये विधान परिषदेवर पाठवले.
  • राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनिल परब यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.

मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना लक्ष्य-

  • केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
  • शिवसेनेचे काही मोठे नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
  • मुंबई मनपावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी विरोध प्रयत्न करत असताना शिवसेनेच्या अनिल परबांवर कारवाई सुरू आहे.
  • त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे.
  • अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई मनपा निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Tags: Anil ParabEDShivsenaअनिल परबईडीशिवसेना
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

मुंबईतील शिवसेना उपविभागसंघटक संजय कदमांच्या घरीही ईडीची धाड

Next Post
Sanjay Kadam And Anil Parab

मुंबईतील शिवसेना उपविभागसंघटक संजय कदमांच्या घरीही ईडीची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!