Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

May 26, 2022
in Uncategorized
0
Ajit Pawar Instruction to distribute land to Koyna project victims

मुक्तपीठ टीम

कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कृष्णा खोरे मध्ये समाविष्ट असलेल्या अथवा लगतच्या जिल्ह्यातच जमीन वितरण करावी. याबाबतची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या.

कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, जलसंपदा सचिव विलास राजपूत, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह ( दूरदृश्य प्रणालीद्वारे) श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करावी. यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून अर्ज मागवून घ्यावेत. अर्जाची छाननी करावी. अर्ज करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील जमीन वितरण करण्याबाबत कार्यवाही करावी. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण झाल्यावर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्याबाबत विचार करावा, अशा सूचना दिल्या.

समन्यायी पाणी वाटप योजनेतून तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यातील १०८ गावांना पाणी देण्यात येणार आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रा लगतच्या गावांना पाणी देणार आहेत. या योजनेचे येत्या बारा जून रोजी विविध ठिकाणी उद्घाटन करण्याचा आज निर्णय घेण्यात आला. या योजनेतून वंचित असलेल्या गावांना पाणी दिले जाणार आहे.

बैठकीस मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारुगडे, कार्यकारी अभियंता महेश रासनकर, श्रमिक मुक्ती दलाचे आनंदराव पाटील, संपत देसाई, चैतन्य दळवी आदी उपस्थित होते.


Tags: ajit pawarKoyna projectKoyna Project Victimsअजित पवारकोयना प्रकल्पग्रस्तजमीन वितरण
Previous Post

सफाई कामगारांच्या मागण्या व समस्यांबाबत मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेणार

Next Post

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान – कृषी मंत्री दादाजी भुसे

Next Post
Maharashtra number 1 exporter of agricultural products in the country

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान - कृषी मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!