मुक्तपीठ टीम
‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला…
- नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली.
- त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं.
- मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे.
- त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल.
- इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही.
‘मी पुन्हा येईन…, हे वाक्य आपल्याला खरं करायचंय!!
- या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं.
- ‘मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे.
हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. - मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.