Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेत जीवघेणं गन कल्चर! पाच वर्षांमध्ये १००पेक्षा जास्त शाळांमध्ये गोळीबार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
America

मुक्तपीठ टीम

अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ निष्पाप मुलांचा समावेश आहे. अमेरिकेत शाळांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अमेरिकेत गेल्या काही वर्षांत शाळांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत शाळांमध्ये गोळीबाराच्या १०० हून अधिक घटना घडल्या आहेत. तसच, यावर्षी अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या २०० हून अधिक घटनांची नोंद झाली आहे.

अतिरेकींच्या निशाण्यावर टेक्सासच्या शाळा

  • अमेरिकेत जास्तकरून शाळांनालक्ष्य केले जात आहे.
  • गेल्या काही आकडेवारींवर नजर टाकली तर, टेक्सासमध्ये शाळेच्या आत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
  • २०१६ मध्ये टेक्सासमधील अल्पाइन शाळेत असेच गोळीबार झाले होते. यामध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला.
  • यानंतर २०१८ मध्येही अशीच घटना घडली होती.
  • टेक्सासमधील सेंट फे स्कूलमध्ये एका १७ वर्षीय हल्लेखोराने मुलांवर गोळीबार केला आणि यात १० जणांचा मृत्यू झाला.
  • यानंतर गेल्या वर्षी २०२१ मध्ये टिम्बरव्ह्यू स्कूलमध्येही गोळीबार झाला होता. मात्र, कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र अनेक जण जखमी झाले.

टेक्सासशिवाय अमेरिकेतील इतर शाळांमध्येही अशाच घटना घडल्या आहेत. २०१२ मध्ये अमेरिकेतील न्यू टाऊन येथील सॅंडी हूक स्कूलमध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये २० शाळकरी मुलं आणि सहा शिक्षकांसह २६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिशिगन हायस्कूलमध्ये गोळीबार झाला होता, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता.

चार महिन्यांत २१२ ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या

  • अमेरिकेच्या स्वतंत्र डेटा संकलन संस्थेच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये आतापर्यंत २१२ सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
  • याशिवाय २०२१ मध्ये अमेरिकेत गोळीबाराच्या ६९३ घटना घडल्या.
  • २०२२ मध्ये ६११ ठिकाणी गोळीबार झाला आणि २०१९ मध्ये ४१७ ठिकाणी अशाच घटना घडल्या.

आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये अमेरिकेत शाळांमध्ये गोळीबाराच्या ३४ घटना घडल्या. २०२० मध्ये १० शाळा आणि २०१८ आणि २०१९ मध्ये २४ घटना घडल्या. त्याच वेळी, २०२२ मध्ये आतापर्यंत २७ शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

अमेरिकेतील अशा घटनांमधले मुख्य कारण म्हणजे येथील गन अॅक्ट. अमेरिकेतील ‘गन कल्चर’चा संबंध तिथल्या राज्यघटनेशी आहे. अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदेशीर आधार घटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये समाविष्ट आहे. तोफा नियंत्रण कायदा १९६८ नुसार, रायफल किंवा कोणतीही लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे, जसे की हँडगन सारखी इतर शस्त्रे खरेदी करण्यासाठी आहे. अहवालानुसार, ३३० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या अमेरिकेतील सामान्य नागरिकांकडे ३९ कोटी शस्त्रे आहेत.


Tags: Americagood newsgun culturemuktpeethschool shootingsUSA Texasअमेरिकाअमेरिका टेक्सासगन कल्चरचांगली बातमीमुक्तपीठशाळांमध्ये गोळीबार
Previous Post

मालवण बोट दुर्घटना: आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताना निलेश राणेच झाले ट्रोल!

Next Post

आजचा भारत बंद कशासाठी? बामसेफचे नेते वामन मेश्राम यांनी मांडली भूमिका

Next Post
Bharat Bandh on 25 may 2022

आजचा भारत बंद कशासाठी? बामसेफचे नेते वामन मेश्राम यांनी मांडली भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!