मुक्तपीठ टीम
श्री राम जन्मभूमी अयोध्येत भगवान राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. १ जून रोजी भगवान राम मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सकाळी ९ ते ११ या वेळेत पूजा करून गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात करतील. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात प्रभू रामाच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामाला कोरलेल्या दगडांनी सुरुवात होणार आहे. अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी दिली.
रामजन्मभूमी संकुलात मंदिराच्या उभारणीसाठी मंडप तयार करण्याचे काम सुरू आहे. सुमारे २१ फूट उंचीचा प्लॅटफॉर्म ग्रॅनाइट दगडांनी बनवला जाणार आहे. मंदिराच्या ३६० फूट लांब आणि २३५ फूट रुंद परिसरात २१ फूट उंचीच्या मंडपाचे बांधकाम ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे, मात्र गर्भगृहाच्या मंडपाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करायचे आहे. यातून मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. प्रथम वैदिक आचार्य गर्भगृहात दगडाची पूजा करतील, त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कामाचा शुभारंभ करतील. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या मते हा दिवस अतिशय शुभ आहे. कारण, अनेक वर्षांनी ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया तिथीला मृगाशिरा नक्षत्राने दुर्मिळ संधि व सर्वसिद्ध योग तयार होत आहे.
डिसेंबर २०२३ पर्यंत रामजन्मभूमी मंदिरात भाविकांची पूजा सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर मंदिराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू राहील, जी २०२५ मध्ये पूर्ण होईल. त्याचप्रमाणे, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळाचे कामही डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू होईल. जेणेकरून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना भगवान रामाची पूजा करता येईल. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळासाठी आवश्यक जमिनीचे संपादन सुरूवातीलाच पूर्ण झाले आहे. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ४०० एकर जागा उपलब्ध करून देण्याची खात्री केली आहे, तर ३३० एकर जमीन नागरी विमान वाहतूक विभागाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.