शेतकऱ्याचे जीवन हे कष्टदायी असते. अनेकदा कष्टानं मिळवलेल्या पीकासाठी योग्य तो भावही मिळत नाही. तेव्हा काही शेतकरी संतापाने टोमॅटो किंवा कांदा रस्त्यावर फेकतात. मात्र बुलढाण्यातील एक शेतकरी धनानं नसला तरी मनानं कुबेर आहे. कांद्यात नुकसान झाल्यावरही त्याने तब्बल २०० क्विंटल कांद्याचे मोफत वाटप केले. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून तो शेगावच्या रहिवाशी आहे.