मुक्तपीठ टीम
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून काश्मीरला ओळखलं जातं. देशभरात बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यानं जीवाची काहिली होतेय. पण काश्मिरात सुखद गारवा आहे. त्यामुळेच स्वर्गीय सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी काश्मीरमध्ये लाखो पर्यटकांची गर्दी झाली आहे.
दरी-खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या काश्मीरमध्ये निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. खोऱ्यात बदललेल्या वातावरणामुळे आता लाखो पर्यटक ते पाहण्यासाठी पोहोचले आहेत. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांएवढे पर्यटक यंदा पहिल्या चार महिन्यांतच पोहचले आहेत.
श्रीनगरपासून गुलमर्ग आणि पहलगामपर्यंतचे रस्ते पर्यटकांनी गजबजले आहे. श्रीनगरच्या दाल सरोवरात रात्री उशिरापर्यंत पर्यटक शिकारातून फेरफटक्याचा आनंद घेत आहेत. बहुतांश हॉटेल्स जुलैपर्यंत बुक झाली आहेत. खोऱ्यात प्रदीर्घ काळानंतर पर्यटनाच्या या टप्प्याने जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला कलाटनी दिली आहे.
यावर्षी एप्रिलपर्यंत ६ लाख पर्यटकांची काश्मिरमध्ये उपस्थिती होती
- २०२१ मध्ये संपूर्ण वर्षभरात ६.६१ लाख पर्यटक आले होते.
- श्रीनगरमध्ये दररोज पाच हजार पर्यटक येत आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १ हजार ८०० पर्यंत होता.
- यावर्षी जानेवारीमध्ये ६० हजार, फेब्रुवारीमध्ये १.०५ लाख आणि एप्रिलमध्ये २.६ लाखांनी खोऱ्याला भेट दिली.
- मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दाल सरोवराच्या काठावर आयोजित ट्युलिप महोत्सवाला विक्रमी साडेतीन लाख पर्यटकांनी भेट दिली होती.
गुरुमार्गच्या गंडोला येथे एका महिन्यात १२.५४ कोटी मिळाले
- गुरुमार्ग येथील गंडोलाचा व्यवसाय विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
- २०२१-२२ या वर्षात गांडोला येथून ४८.२३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, यावर्षी एप्रिलमध्ये येथून १२.५४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- ट्रॅव्हल एजंट सोसायटी ऑफ काश्मीरचे उपाध्यक्ष अथर यामीन यांच्या मते, यावर्षी पर्यटकांच्या संख्येचा विक्रम मोडला जाणार आहे.
- घाटीतील बजेट हॉटेल्सपासून ते बड्या स्टार हॉटेल्सपर्यंत जुलैपर्यंत बुकिंग असते.
पाहा व्हिडीओ: