मुक्तपीठ टीम
शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला चांगले यश मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीसह चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. यावेळी त्यांनी या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहाणे टाळले. आनंद दिघे यांचा मृत्यूचा प्रसंग मी पाहू शकलो नसतो. त्यामुळे मी चित्रपट संपण्यापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आनंद दिघे गेले तेव्हा शिवसेनेवर आघात होता!
- मी आता शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही.
- कारण आनंद दिघे गेले तेव्हा आमच्या सगळ्यांवर आघात झाला होता.
- आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब ठाकरे मी पाहिले आहेत.
- आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे ही दोन्ही अजब रसायनं होती.
- त्याचं वर्णन नाही करता येणार.
नेमकं चित्रपटात काय दाखवलं आहे?
- ‘धर्मवीर’च्या शेवटच्या प्रसंगी मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात, तेव्हा आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात होतो.
- उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.
- राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी सिंघानिया रुग्णालयात गेले होते.
- पण हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
- त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग बघण्याचे टाळले.