मुक्तपीठ टीम
आजकाल सरकारी असो वा कॉर्पोरेट सर्व ठिकाणी सध्या जीमेल (Gmail)चा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे पाहायला मिळते. जीमेलच्या माध्यमातून कामासंबंधित असो किंवा आमंत्रण देण्यापर्यंत, तसेच संवाद साधण्यासाठीही उपयोग केला जातो. पण बर्याच वेळा जीमेलवर आपल्याला माहित नसलेले ईमेल येतात. सध्या हॅकिंग आणि ऑनलाईन फसवणूकीचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळे आपल्या जीमेलवर आलेले ईमेल कोण पाठवितात, कोठून येतात हे माहिती करण्याची उत्सुकता असते. त्यामुळे हे ईमेल कोठून आणि कसे येतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
आपल्याला येणाऱ्या ईमेलचे लोकेशन आणि अॅड्रेस शोधण्याचे ३ मार्ग आहे. यातील पहिला पर्याय म्हणजे आयपी अॅड्रेस ट्रॅक करणे, दुसरा पर्याय स्थान आणि पत्ता शोधण्याचे ३ मार्ग आहेत. पहिला पर्याय आयपी अॅड्रेस ट्रॅक करणे आहे. दुसरे म्हणजे ईमेल आयडी शोधणे आणि तिसरा फेसबुकद्वारे शोधणे.
पहिला पर्याय आयपी अॅड्रेस ट्रॅक
- आपल्याला जीमेलवर प्राप्त झालेली कोणताही ईमेल उघडा. नंतर उजव्या बाजूला दिसणार्या बटणावर टॅप करा.
- मग शो ओरिजनल वर टॅप करा. यानंतर एक नवीन टॅब उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला ईमेल पाठविणार्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेस कळेल.
- यानंतर तुम्हाला आयपी पत्ता कॉपी करावा लागेल.
- त्यानंतर वुल्फ्राम अल्फावर जा. येथे आयपी अड्रेस शोधा.
- येथून आपल्याला ईमेलचे लोकेशन कळेल. जर ती कंपनी असेल तर त्याचे नाव देखील कळेल.
दुसरा पर्याय ईमेल आयडी शोधणे
- सर्व प्रथम आपण पीपीएल आणि स्पोकिओ वेबसाइटवर जावे लागेल.
- यात आपल्याला आलेल्या ईमेल आयडीचा शोधा घ्या.
- शोध घेतल्यानंतर, मेल पाठविलेल्या व्यक्तीचे लोकेशन आपणास कळेल.
- हे दोन्ही वेबसाइट पेड आहेत त्यामुळे युजर्सना यासाठी पैसे मोजावे लागतील.
तिसरा पर्याय म्हणजे फेसबुक
- ज्याचे लोकेशन शोधायचे आहे, त्याचे मेल आयडी ओपन करा.
- त्यानंतर फेसबुक वर जाऊन त्याचा शोध घ्या.
- जर या आयडीसह त्या व्यक्तीचा ईमेल आयडी तयार केला गेला असेल तर सर्व माहिती मिळू शकते.