मुक्तपीठ टीम
मुंबईकरांच्या जेवणात बनावट पनीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. यामुळेच बाजारात मिळणारं पनीर हे असली आहे की नकली हे कसं ओळखायचं असा प्रश्नच आता निर्माण झाला आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बनावट पनीर ओळखता येईल.
असली पनीर कसे ओळखावे?
- आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे.
- मिठाई, खवा, दूध, दही आणि पनीर हे प्रत्येक घराघरात खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.
- भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
- पनीर हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत मानला जातो आणि त्याचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो, परंतु ते वापरण्यापूर्वी आम्ही तुम्हाला ४ सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खऱ्या पनीरमधला फरक समजू शकाल.
असली पनीर कुस्करल्यावर पसरत नाही
- जर तुम्ही असली पनीर खात असाल, तर तुम्ही ते मॅश केल्यावर ते पसणार नाही, तर नकली पनीर अधिक दाबामुळे पसरते.
चाचणी करण्यासाठी, पनीर हातात घ्या आणि बारीक करा, जर पनीर पसरले तर याचा अर्थ ते बनावट आहे कारण बनावट पनीरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर मिसळली जाते, त्यामुळे ते पसरते.
असली पनीरवर आयोडीन रसायनांचा काहीही परिणाम होणार नाही…
- पनीर पाण्यात उकळून थंड होऊ द्या.
- आता त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब शिंपडा.
- आयोडीन टिंचर हे एक प्रकारचे रसायन आहे जे तुम्हाला बाजारात सहज मिळेल.
- जर पनीरचा रंग निळा झाला तर ते बनावट पनीर आहे.
खरे पनीर मऊ असते
- खरे पनीर मऊ असते, तर बनावट पनीर कडक असते आणि ते रबरासारखे पसरते कारण त्यात डिटर्जंट किंवा युरियासारखे रसायन मिसळले जातात.
टेस्टमध्ये मूळ पनीरचा रंग बदलणार नाही
- पनीर असली आहे की नकली हे तुम्ही त्याच्या रंगावरून तपासू शकता. ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला फक्त १० मिनिटे लागतील. या चाचणीत जर पनीरचा रंग लाल झाला तर याचा अर्थ पनीर बनावट आहे.
कसे तपासायचे ते जाणून घ्या
- पनीर उकळून थंड होऊ द्या.
- आता तूर डाळीची पावडर पनीरमध्ये मिसळा.
- तुम्ही पनीरमध्ये सोयाबीन देखील घालू शकता.
- आता पनीर १० मिनिटे तसेच सोडा.
- जर रंग लाल झाला तर समजून घ्या की ते नकली पनीर आहे.
- जर तुम्हाला असली आणि नकली पनीरमधील फरक समजला असेल, तर आता तुम्ही असली पनीर सहज ओळखू शकाल.