मुक्तपीठ टीम
पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात फूलटाइम एमबीबीएस या पदासाठी ०३ जागा, अधिपरिचारीका या पदासाठी १७ जागा, आरोग्य सेविका या पदासाठी १८ जागा, एलएचव्ही या पदासाठी ०१ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ०९ जागा, पार्टटाइम एमबीबीएस या पदासाठी ०४ जागा अशा एकूण ५२ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र. १,२ आणि ६ साठी १८ मे २०२२ तर, पद क्र. ३,४,५ साठी १९ आणि २० मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमबीबीएस
- पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बी.एससी (नसिंग)
- पद क्र. ३- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम
- पद क्र.४- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बीएससी (नर्सिंग)
- पद क्र. ५- १) एचएससी २) डीएमएलटी
- पद क्र.६- एमबीबीएस असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता
pmcnuhm@gmail.com
मुलाखतीचे ठिकाण
- पद क्र.१,२ आणि ६ साठी उपजिल्हा रूग्णालय पनवेल
- पद क्र. ३,४ आणि ५ साठी NIPHTR, प्लॉट क्र. ६ आणि ६ ए, सेक्टर १८, खांदा कॉलनी पनवेल
अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.panvelcorporation.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: