मुक्तपीठ टीम
झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या संबंधित २० ठिकाणांवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. यात कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच ईडीने शुक्रवारी पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा ला अटक केली आहे. मनरेगा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान पूजा सिंघल यांच्या अटकेवरून दिवसभर चर्चेला ऊत आला होता. त्यांचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं विश्वासपात्र असणं राज्यात त्यांचं महत्व वाढवणारं ठरलं मात्र तेच ईडीपिडा मागे लागण्यातही कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्यांना रात्री गजाआड देण्यात आलेलं जेवण काही त्यांच्या गळ्याखाली उचरलं नाही…
ईडी कार्यालयाबाहेर दिवसभर गर्दी…
- बुधवारी, रांचीमधील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयाबाहेर खाण आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या अटकेवरून दिवसभर गोंधळ उडाला.
- बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.
- पूजा सिंघल रात्री १०.१५ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या.
- तेथे त्याची चौकशी करण्यात आली.
- यानंतर पती अभिषेक झा याला दुपारी बोलावण्यात आले, त्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली.
- संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली.
- ईडी कार्यालयातच त्यांचे मेडिकल करण्यात आले. यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालय न्यायालयात नेण्याची तयारी सुरू होती.
- सायंकाळी ७.३५ च्या सुमारास त्यांना प्रांत कार्यालयातून न्यायालयात नेण्यात आले.
दिवाणी न्यायालय आणि जज कॉलनीत गोंधळ उडाला
- पूजा सिंघलच्या अटकेनंतर दिवाणी न्यायालय आणि न्यायाधीश कॉलनीत तासनतास गोंधळ उडाला होता, अटकेची माहिती मिळताच ईडीचे विशेष सरकारी वकील बीएमपी सिंग आणि सरकारी वकील आतिश कुमार प्रथम दिवाणी न्यायालयात पोहोचले, त्यानंतर प्रसारमाध्यमे आणि सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ईडीचे अधिकारीही दिवाणी न्यायालयात पोहोचले.
- येथील कागदोपत्री कामकाजानंतर सर्व विशेष न्यायाधीश पीके शर्मा यांच्या निवासी कार्यालयात गेले, तेथे सुनावणी झाली आणि पूजा सिंघल यांना तुरुंगात पाठवण्यात आले.
कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी
- येथे ईडी कार्यालयाबाहेर सर्वसामान्यांची गर्दी झाली होती.
- विमानतळाच्या दिशेने येणारे लोक गर्दी पाहून थांबत होते.
- आजूबाजूच्या घरांच्या छतावरूनही लोक हे दृश्य पाहत होते.
- पूजा सिंघल यांना संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार कार्यालयाच्या आवारात आली.
- बराच वेळ गाडी तिथेच होती, मात्र नंतर या गाडीऐवजी मोठ्या गाडीने त्यांना नेण्यात आले.
तुरुगांत मिळाली चपाती-भाजी!
पूजा सिंघलना बुधवारी ईडीने तुरुंगात पाठवले, तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तुरुंगात चपाती, भाजी, मसूर आणि कोशिंबीर देण्यात आले, थोडीशी रोटी खाल्ल्यानंतर पूजा सिंघल म्हणाल्या की, आता खायची इच्छा नाही. त्या खूप दुःखी आणि गप्प होती.पूजा सिंघलना महिला कक्षात ठेवण्यात आले आहे.