मुक्तपीठ टीम
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक केली आहे. मनरेगा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने याआधी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानासह, पतीच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. पूजा सिंघल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पती अभिषेक यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली.
कोण आहेत पूजा सिंघल?
- पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
- पूजा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
- या यशामुळे त्यांचं नाव लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
- यूपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर त्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी बनल्या.
- मूळच्या देहरादूनच्या असलेल्या पूजा यांनी झारखंडमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
- २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची जवळपास १९ ठिकाणी नियुक्ती झाली आहे.
पूजा सिंघल यांचा कार्यकाळ…
- पूजा सिंघल यांची पहिली पोस्टिंग हजारीबाग, झारखंड येथे सदर उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती.
- येथील कामामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या.
- शिक्षण प्रकल्पात पदस्थापने दरम्यान त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला होता.
- त्यांनी मुलांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये घोटाळे करणाऱ्या टोळीच्या कारवाया उघड केल्या होत्या.
- त्यांच्या नेतृत्वाखाली झारखंडमध्ये पहिल्यांदाच अपंगांचा डेटा गोळा करण्यात आला.
- रिम्समध्ये डायरेक्टर अॅडमिनिस्ट्रेशन म्हणून त्यांचे कामही वाखाणण्याजोगे होते.
पुजा उपायुक्त असताना वादाच्या भोवऱ्यात…
- सिंघल जिल्ह्य़ात उपायुक्त असताना त्या वादात सापडल्या होत्या.
- खुंटी येथील जिल्हा उपायुक्त पदावर रुजू झाल्यानंतर मनरेगा योजनेत १६ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले.
- या प्रकरणात त्याच्यावर अभियंत्यांशी संगनमत केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
- त्यानंतर त्यांची पोस्टिंग तेथून चतरा येथे झाली.
- चतरा येथील पोस्टिंगदरम्यान त्यांच्यावर नियमांविरुद्ध एका एनजीओला सहा कोटी रुपये दिल्याचा आरोप होता.
- हा मुद्दा आमदार विनोद सिंह यांनी सभागृहात उपस्थित केला.
- विधानसभेच्या समितीनेही चौकशी केली होती.
- चतरा येथेच त्यांच्या पोस्टिंगदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
- यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
पूजा सिंघल यांचे उशिरा प्रमोशन…
- सिंघल यांची कृषी विभागात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- येथील पदस्थापनेदरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना कालबद्ध पद्धतीने पदोन्नती मिळू शकली नाही.
- नंतर उपायुक्त असताना त्यांच्यावरील आरोपांची विभागीय चौकशी करण्यात आली.
- विभागीय चौकशीसाठी उद्योग विभागाचे सचिव ए.पी.सिंग यांना कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले आहे.
- सिंह यांनी तपासानंतर क्लीन चिट दिली होती.
- क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांना बढती देऊन कृषी विभागाचे सचिव करण्यात आले.
- सुमारे तीन वर्षे त्या कृषी खात्यात होत्या.
- रघुवर दास यांचे सरकार पडल्यानंतर त्यांच्या जागी अबू बकर सिद्दीख यांना सचिव करण्यात आले.
- त्याचवेळी सिंघल यांची क्रीडा, कला, संस्कृती आणि पर्यटन विभागात नियुक्ती करण्यात आली होती.
- तेथून त्यांना पुन्हा उद्योग आणि खाण खात्याचे सचिव करण्यात आले.
अनेक घोटाळ्यांत पूजा यांचे नाव!
- २०१३ मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला.
- यावरूनही वाद झाला.
- त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे.
- त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना ६ कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत.
- ही रक्कम मुसळी उत्पादनाच्या नावावर दिली होती, मात्र मनरेगामध्ये अशी तरतूद नव्हती.
- २००९-१० मध्ये पूजा खूंटी जिल्ह्याच्या उपायुक्त झाल्या तेव्हा मनरेगाच्या १८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल झाले होते.