मुक्तपीठ टीम
शिक्षणाला वयाचा अडथळा असू शकत नाही. गरज असते इच्छा आणि परिश्रमाची. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं वय अवघं ८७ वर्षांचं. त्यांच्या मनात शिक्षणाची इच्छा जागली. त्यांनी दहावीमागोमाग बारावीही केली.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते ओम प्रकाश चौटाला यांनी वयानं फारसा फरक पडत नसल्याचं दाखवून दिलंय. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी १०वीनंतर आता १२वी उत्तीर्ण केली आहे. हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा चंदीगडमध्ये बारावीचा निकाल जाहीर केला आणि मार्कशीटही दिली आहे.
अभिषेक बच्चनने ट्विट करत ओम प्रकाश चौटाला यांचे अभिनंदन केले
- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचा निकाल मिळाल्यानंतर बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही ट्विट करून #dasvi लिहिले.
- उल्लेखनीय आहे की, नुकताच अभिषेक बच्चनचा एक चित्रपटही आला होता, ज्यामध्ये तो मुख्यमंत्री झाल्यानंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
- इनेलो सुप्रीमो राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत आणि त्यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा हरियाणातील सर्व जिल्ह्यांना आणि मंडळांना भेटी दिल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना सन्माने निकाल देण्यात आला
- हरियाणा शिक्षण मंडळाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांना १०वी आणि १२वीची मार्कशीट सन्मानपूर्वक दिली आहे.
- वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४२८ व्या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी चौधरी चौटाला आले होते.
- भिवानीमध्ये हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या आदराने माजी मुख्यमंत्र्यांना दहावी आणि बारावीचा निकाल दिला.
बोर्डाच्या दोन्ही परीक्षा फर्स्ट क्लासने उत्तीर्ण
- माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी २०१९ मध्ये १०वीची परीक्षा दिली होती. मात्र, त्यादरम्यान त्यांना इंग्रजीचा पेपर देता आला नाही.
- ओमप्रकाश चौटाला यांचा दहावीचा इंग्रजीचा निकाल न आल्याने हरियाणा शिक्षण मंडळानेही बारावीचा निकाल रोखून धरला होता.
- तसेच, ओम प्रकाश चौटाला यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये १०वीचा इंग्रजीचा पेपर दिला होता, ज्यामध्ये त्यांना ८८ टक्के गुण मिळाले होते.
- वयाच्या ८७ व्या वर्षी ते १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेले नेते बनले आहेत. माजी मुख्यमंत्री १०वी आणि १२वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.