मुक्तपीठ टीम
डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये रिसर्च स्कॉलर्ससाठी सुवर्ण संधी आहे. डीआरडीओद्वारे सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये म्हणजेच सेप्टममध्ये नोकरीची संधी आहे. डीआरडीओच्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटने ज्युनियर रिसर्च फेलोच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे
डीआरडीओ सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटची फेलोशिप केवळ दोन पदांसाठी आहे. उमेदवारांना सेप्टम, डीआरडीओ, मेटकाल्फ हाउस, सिव्हिल लाइन्स, नवी दिल्ली-११००५४ येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदावर नियुक्त केले जाईल.
डीआरडीओ ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी निवड प्रक्रिया आणि अटी
- डीआरडीओ सेप्टम फेलोशिपसाठी उमेदवारांची निवड तात्पुरती असेल आणि त्यांची कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतरच केली जाईल.
- उमेदवाराची पात्रता,गुणांची टक्केवारी किंवा इतर तपशिलांमध्ये काही विसंगती आढळल्यास, उमेदवारी नाकारली जाईल.
डीआरडीओ फेलोशिप शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रतेतील खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रथम श्रेणी बीई/ बीटेकसह गेट/ नेट उत्तीर्ण असलेले उमेदवार किंवा एमई/ एमटेक पदवीसह प्रथम श्रेणीत बीई/ बीटेक पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर उपलब्ध आहे.
पाहा व्हिडीओ: