मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला एकटं पाडून सत्तेसाठी भाजपाशी युती केली आहे. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसनेही भंडाऱ्यात भाजपाचा एक गट फोडत आपली सत्ता आणली आहे. राज्यात राष्ट्रवादीला कडवट विरोध करणाऱ्या भाजपाने दोन जिल्ह्यांमध्ये त्याच पक्षाशी युती केली, पण माजी आमदार चरण वाघमारे यांनी राजकीय सोयीसाठी काँग्रेसला साथ देताच त्यांच्यावर मात्र कारवाई केली आहे.
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला…
- नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे.
- आम्ही यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्या सोबत चर्चा केली.
- त्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली.
- गोंदिया जिल्हा परिषदमध्येसुध्दा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली.
- राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.
- गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काँग्रेसला एकटं पाडलं.
- तिथं अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर यांची निवड झाली.
नाना पटोले यांनीही भाजपाचा एक गट फोडला!!
- भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपाबरोबर हात मिळवणी केली.
- यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
- मात्र नाना पटोले यांनीही भाजप मधील एक गट फोडला.
- भाजपच्या चरण वाघमारे गटाने काँग्रेसला साथ दिली आणि त्या ठिकाणी अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळालं. तर उपाध्यक्ष हे चरण वाघमारे गटाला मिळालं.
- भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २१, भाजपाचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचा एक असं संख्याबळ आहे.
चरण वाघमारेची भंडारा भाजपातून हकालपट्टी!
- माजी आमदार चरण वाघमारेची भंडारा भाजपातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
- आजच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत टरगटाने नाना पटोलेंना साथ दिल्याने भाजपने ही कारवाई केली आहे.
तेव्हा खंजीर कोणी खुपसला? – आशिष मेटे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य चिटणीस आशिष मेटे यांनी नाना पटोलेंना चार वर्षांपूर्वीचं राजकारण आठवण्यास सांगितलं आहे. तेव्हा राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली होती, असा मेटेंचा दावा आहे.
मैत्रीचा हात…पाठीत खंजीर बरररर
गोंदिया जिल्ह्यातील हि चार वर्षापुर्वीची बातमी वाचा आणि ती पण जिल्हा परिषद निवडणुकीचीच.
करुन सवरुन नामनिराळं राहुन @NCPspeaks च्या नावाने बोंबाबोंब करुन फुटेज घ्यायचे बंद केले तर खुप चांगले होईल @NANA_PATOLE जी.@praful_patel @Jayant_R_Patil https://t.co/I2cEWswDby pic.twitter.com/K0UA0aUfCe
— Ashish Sarala Anandrao Mete (@IAshishMete) May 11, 2022