रेल्वे प्रवासादरम्यान विनाकारण चेन पुलिंग केल्याने रेल्वेचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांच्या अडचणीही वाढतात. काहीजण अनेकदा मुद्दाम चेन पुलिंग करतात. त्यामुळे रेल्वे अनेकदा नको त्या ठिकाणी थांबते. मुंबईहून छपराकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसची साखळी काही खोडकर लोकांनी खेचल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे ट्रेन मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या नदीच्या पुलावर थांबली. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सहाय्यक लोको पायलटने जीव धोक्यात घालून ट्रेन पुन्हा सुरू केली. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर युजर्स त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.