मुक्तपीठ टीम
रेल्वे प्रवासादरम्यान विनाकारण चेन पुलिंग केल्याने रेल्वेचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांच्या अडचणीही वाढतात. काहीजण अनेकदा मुद्दाम चेन पुलिंग करतात. त्यामुळे रेल्वे अनेकदा नको त्या ठिकाणी थांबते. मुंबईहून छपराकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसची साखळी काही खोडकर लोकांनी खेचल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे ट्रेन मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या नदीच्या पुलावर थांबली. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सहाय्यक लोको पायलटने जीव धोक्यात घालून ट्रेन पुन्हा सुरू केली. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर युजर्स त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.
रेल्वे मंत्रालयाने व्हिडिओ ट्विट केला आहे
- ही घटना ५ मे २०२२ रोजी घडली, जेव्हा गोदान एक्स्प्रेस मुंबईहून छप्राला निघाली होती.
- एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर मुंबईपासून ८० किमी अंतरावर टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान उभ्या असलेल्या ट्रेनचा व्हिडिओ ट्विट करून प्रवाशांना ट्रेनमध्ये अनावश्यक चेन पुलिंग न करण्याचे आवाहन केले आहे.
Pulling the Alarm Chain for no reason can cause trouble to many!
Satish Kumar, Asst. Loco Pilot of CR,took the risk of resetting Alarm Chain of Godan Express,halted over the River Bridge between Titwala & Khadavli Station.
Pull the chain of a train only in case of an emergency. pic.twitter.com/I1Jhm9MESh
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 6, 2022
छपराला जाणारी गोदान एक्स्प्रेस कालू नदीवर थांबली
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार हे नदीवरील पुलावर अडकलेल्या छपराला जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या खाली जाऊन ट्रेनमधील तांत्रिक बिघाड दूर करताना दिसत आहेत.
- मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की, मुंबईहून छपराकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन काही खोडकरांनी खेचली.
- त्यामुळे टिटवाळा ते खडवली दरम्यान काळू नदीच्या पुलावर गाडी थांबली.
आता वंदे भारत ट्रेनची चाके बंगळुरूमध्ये होणार तयार
- युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमधून वंदे भारत ट्रेनच्या चाकांच्या आयातीवर परिणाम झाल्यानंतर, रेल्वेने आता ते बेंगळुरूमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवडती योजना आहे आणि रेल्वेला ती वेळापत्रकानुसार पुढे नेण्याची इच्छा आहे.
- १२८ चाकांची पहिली खेप युक्रेनमधून त्याच्या शेजारील देश रोमानियाला रस्त्याने नेण्यात आली असून ती सध्या तेथेच अडकली आहे.
- ही खेप मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विमानाने भारतात आणणे अपेक्षित आहे.
- युक्रेनने भारताकडून एकूण १६ कोटी अमेरिकन डॉलरमध्ये ३६ हजार चाके मागवली आहेत.
- युक्रेनमधील युद्धामुळे उत्पादन प्रभावित झाल्याने, आता दोन वंदे भारत रेल्वेची चाके येलाहंका, बंगळुरू येथील रेल्वे व्हील फॅक्टरीत बनवली जातील. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका रेल्वेमध्ये १६ डबे आहेत.
पाहा व्हिडीओ: