मुक्तपीठ टीम
शिवसेनेतर्फे येत्या १४ मे रोजी बीकेसी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेला संबोधित करणार असून, या सभेचा ‘टिझर’ रविवारी शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या अयोध्या भेटीसाठी शिवसेनेने तिथं केलेला ‘असली हिंदुत्व, नकली हिंदुत्व’ प्रचारही हिंदुत्वाच्या मु्द्द्यावर शिवसेना आपली प्रतिमा कायम राखण्याच्या प्रयत्नात असल्याचे दाखवणारा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली,असे उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
#कसल_हिंदुत्व_उरलीय_फक्त_सत्तेची_अगतिकता
शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे. त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे 1/4
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2022
- शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे.
- त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय.
- एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली, त्यात आणखी खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायलाय पाहिजे असं आमंत्रणही देताहेत.
- पण तुच्याकडे खरं हिंदुत्व राहिलंय कुठे? ते शिवसेनाप्रमुखांच्या काळात होतं.
- पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून ते हिंदुत्व कधीच सोडलंय.
आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता!!
- मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून त्या हिंदुत्वावरील हक्क तुम्ही गमावून बसलाय.
आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता. - गेल्या अडीच वर्षांत पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या, रझा अकादमीच्य गुंडांनी केलेला हिंसाचार आणि आता गाजत असलेल्या भोंग्यांच्या विषयात ती वारंवार दिसलीय.
- त्यामुळे आता तुम्ही कसला हिंदुत्वाचा हुंकार ऐकवणार, आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण.
- त्यातून तुम्ही कसला हिंदुत्त्ववादी विचार मांडणार? आणि तो कोण ऐकणार?