मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिंदीवरील भोंग्याच्या आक्रमक भूमिकेमुळे यांचा फटका आता शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना बसला आहे. पोलीस प्रशासनाने राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसीनंतर वर्षानुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाणारी साई बाबांची पहाटेची काकड आरती आणि रात्री साडे दहा वाजता होणारी शेजारती भोंग्यांविनाच होऊ लागली आहे. पोलिसांनी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शिर्डी संस्थानला भोंग्यांची परवानगी दिली असल्यामुळे भोंग्याविना होणाऱ्या आरतीमुळे भाविक नाराज झाले आहेत. दरम्यान पहाटेची अजान भोंग्यांविना होईल मात्र साईंच्या आरतीसाठी भोग्यांना परवानगी द्यावी अशी विनंती शिर्डीतील मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केली.
शिर्डी संस्थानने नियमांनुसार भोंगा परवानासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत भोंगा परवाना दिलेला आहे. त्यामुळे शिर्डीत दररोज पहाटे पाच वाजता होणारी काकड आरती आणि साडे दहा वाजता होणारी शेजारती बुधवारपासून मात्र भोंग्याविना पार पडली. यामुळे भोंग्यांवरून आरती ऐकू न आल्याने साईभक्तांमध्ये नाराजी आहे.
*!! ॐ साई राम !!*
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी*
*!! ॐ Sai Ram !!*
*Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi*
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
*आरती :- शिर्डी माझे पंढरपूर*
*गुरुवार दिनांक ०५ मे २०२२*
*Aarti : – Shirdi Majhe Pandharpur*
*Thursday 05 May 2022* pic.twitter.com/h7gscb2jIX— Shri Saibaba Sansthan Trust Shirdi (@SSSTShirdi) May 5, 2022
शिर्डीतील काकड आरती आणि शेजारती भोंग्याविना पार पडल्यामुळे शिर्डीतील मुस्लिम समाजाने प्रशासनाला एक पत्र लिहिलं आहे. पहाटेची अजान भोंग्यांविना होईल मात्र साईंच्या आरतीसाठी भोंग्यांना परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. शिर्डी हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. त्यामुळे तिथल्या आरतीसाठी भोंगे असावे अशी मुस्लिम समाजाची भावना असल्याचे जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्धीन ईनामदार यांनी सांगितलेले आहे. शिर्डीत मुस्लिम समाजाने आणि जामा ट्रस्टने एकत्र येऊन बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यासर्व घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला…शिर्डी आणि त्रेंबकेश्वर सह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्या मुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्ष भोंग्या द्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते, असे संजय राऊत म्हणाले आहे.
भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला..
शिर्डी आणि त्रेंबकेश्वर सह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्या मुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही.
मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्ष भोंग्या द्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 4, 2022