मुक्तपीठ टीम
अंतराळ मोहिमा म्हटलं की गगनभेदी खर्च ठरलेलाच. त्यामुळेच संशोधक त्यासाठीचा खर्च कसा आणि कुठे कमी करता येईल यावर विचार करत असतात. अर्थात तसं करताना त्यांना कुठेही सुरक्षेशी तडजोड करता येत नाही. आता ऑस्ट्रेलियातील रॉकेट लॅब या कंपनीने एक भन्नाट प्रयत्न केला. याअंतर्गत उपग्रहांना अवकाशात नेण्यासाठी वापरण्यात आलेले रॉकेट हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते पकडलेही. पण ते पकडताच भार जास्त वाटल्याने हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबर्सना सुरक्षेच्या कारणास्तव ते सोडावे लागले. त्यानंतर ते रॉकेट प्रशांत महासागरात पडले. अर्थात तरीही आपला प्रयत्न यशस्वी झाल्याचा दावा रॉकेट लॅबने केला आहे.
प्रशांत महासागरात या रॉकेटला बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ऑपरेशन यशस्वी असल्याचे वर्णन करताना, कंपनीने अनपेक्षित भार ही एक किरकोळ समस्या मानली. तसेच ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असा दावाही केला. रॉकेट लॅबचे सीईओ पीटर बेक यांनी सांगितले की, उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर हेलिकॉप्टरमधून पृथ्वीवर परतणाऱ्या रॉकेटला पकडण्याचे काम खूप कठीण आहे. त्यांनी या कामाची तुलना ‘सुपरसॉनिक बॅले’शी केली. पण त्यात सुधारणा केली जाईल.
याआधीचे रॉकेट पकडण्याचे प्रयत्न
- ०३ मे २०२२ रोजी इलेक्ट्रॉन रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले हे मुख्य बूस्टर सेक्शन पृथ्वीवर पडण्यापूर्वी याद्वारे ३४ उपग्रह कक्षेत पाठवण्यात आले.
- पॅराशूटने त्याचे उतरणेही मंद केले. त्यानंतर, हेलिकॉप्टरच्या क्रू सदस्यांनी पॅराशूटद्वारे रॉकेटला रोखले, परंतु हेलिकॉप्टरवरील एकूण भार चाचणी आणि ‘सिम्युलेशन’ पॅरामीटर्सपेक्षा जास्त होता आणि म्हणून त्यांनी ते कमी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ: