Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांचं पद धोक्यात!

May 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Jharkhand CM Hemant Soren

मुक्तपीठ टीम

झारखंडचे मुख्यमंत्री आणि खनिकर्म मंत्री हेमंत सोरेन यांचे पद धोक्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सोरेन यांना नोटीस बजावली आहे. दगडखाणी लीज प्रकरणात प्रथमदर्शनी घोटाळा दिसत असल्याचे म्हणत निवडणूक आयोगाने सोरेन यांना नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने अनगड येथील दगडखाणीच्या भाडेपट्ट्याचे वाटप झाल्याची तक्रार भाजपाने राज्यपालांकडे केली होती. मात्र, या तक्रारीनंतर हे वाटप सरेंडर करण्यात आले.

 

मुख्यमंत्र्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, स्वतःच्या नावावर दगडखाणीचे भाडेतत्त्वावर घेणे हे लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ९ अचे उल्लंघन असल्याचे दिसते. राज्यपाल रमेश बैस यांनी दगडखाण भाडेपट्टा प्रकरणी त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्याचे मुख्य सचिव सुखदेव सिंग यांना संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यास सांगितले होते. मुख्य सचिवांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवली. आता मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर निवडणूक आयोग राज्यपालांना आपला अभिप्राय देईल, ज्याच्या आधारे राज्यपाल निर्णय घेतील.

 

राज्यपालांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही कळवले

  • राज्यपाल रमेश बैस यांनीही यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली होती. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ही माहिती देताना त्यांनी याप्रकरणी जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत, ती मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी पुरेशी असल्याचे सांगितले आहे.
  • तत्पूर्वी, राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम १९२ (२) अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाचे मत मागवले आहे.
  • लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
  • मुख्य सचिवांच्या कागदपत्र पडताळणीनंतर आयोगाने कारवाई केली.

Tags: election commissionHemant SorenJharkhandझारखंडदगडखाणी लीज प्रकरणनिवडणूक आयोगहेमंत सोरेन
Previous Post

यश : एक अस्सल नायक!

Next Post

“दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची” चित्र प्रदर्शनाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

Next Post
जुहु चौपाटी परिसरात आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद 1

"दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची" चित्र प्रदर्शनाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!