मुक्तपीठ टीम
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस सिलेंडरची किंमत २ हजार २५३ रुपयांवरून २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे, तर ५ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ६५५ रुपये आहे. याआधी पहिल्या एप्रिलपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ मार्च रोजी एलपीजीच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आतापासून १ मे हा उज्ज्वला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
आता १ मे पासून महानगरांमध्ये एलपीजीसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार
- कोलकाता- २ हजार ४५५ रूपये
- मुंबई- २ हजार ३०७ रूपये
- चेन्नई- २ हजार ५०८ रूपये
- १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढली होती, जी २२ मार्च रोजी ९ रुपयांनी कमी झाली होती.
- ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १७० रुपयांनी वाढल्या होत्या.
१ मे २०१६ पासून ‘उज्वला दिवस’ योजना सुरू
- १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.
- याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर वाटपाची मोहीम सुरू करण्यात आली.
- या योजनेतील उपलब्धी पाहता, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १ मे २०२२ हा दिवस उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
एलपीजी पंचायतींचे आयोजन
यानिमित्ताने तेल विपणन कंपन्यांकडून ५ हजार एलपीजी पंचायतीचे आयोजन केले जात आहे. लोकांमध्ये या योजनेची माहिती दिली जाणार असून नवीन कनेक्शनचेही वाटप करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी एलपीजीच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या पंचायतींमध्ये लोक त्यांच्या प्रतिक्रिया देतील आणि एलपीजीचा वापर सुरू ठेवण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त ग्राहकांची नोंदणी करण्याचा प्रयत्न केला जाईल.