Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चांद्रयान-३ ची जोरात तयारी, ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारीचं नियोजन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Chandrayaan-3

मुक्तपीठ टीम

चंद्रावर भारतीय चांद्रयानाच्या स्वारीसाठी सर्वच भारतीय आतूर आहेत. चांद्रयान-३ ची तयारी अगदी जोरात आणि जोशात सुरू आहे. यावेळी या तयारीला यश मिळणारच अशी आशा सर्वांनाच आहे. इस्रोने नुकतेच ‘मिशन मून’चे फोटो शेअर केले आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास या वर्षी ऑगस्टमध्ये हे मिशन सुरू केले जाऊ शकते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पेस ऑन व्हील्स’ या डॉक्यूमेंट्रीत हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

इस्रोने आपल्या वेबसाईटवर ही डॉक्यूमेंट्री अपलोड केली आहे. यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत भारताने प्रक्षेपित केलेल्या ७५ उपग्रहांचेही वर्णन केले आहे.

चांद्रयान मोहिमेची डॉक्युमेंट्री

  • इस्रोने जारी केलेल्या डॉक्युमेंट्रीत चांद्रयान-३ चे लँडर दाखवण्यात आले आहे.
  • चंद्रावर उतरण्याचा भारतीय अवकाश मोहिमेचा हा दुसरा प्रयत्न आहे. याशिवाय १७ मिनिटांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये आदित्य एल१ मिशन आणि गगनयान देखील दाखवण्यात आले आहेत.

चांद्रयान-२ चे ऑर्बिटर वापरण्यात येणार

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. सिवन म्हणाले होते की, “लवकरच इस्रो चांद्रयान-३चे प्रक्षेपण निश्चित करण्याच्या स्थितीत असेल. या मिशनमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरचा वापर केला जाईल, तो आमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. कोरोना महामारीचा परिणाम आमच्या सर्व प्रकल्पांवर झाला आहे.”

आता चांद्रयान-३ची तयारी

  • मागील चांद्रयान-२ मोहिमेनंतर सुमारे दोन वर्षांनी चांद्रयान-३ प्रक्षेपित होत आहे. हे मिशन पूर्णपणे यशस्वी झाले नाही.
  • चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर त्यांच्या गंतव्यस्थानापासून काही अंतरावरच कोसळला होता.
  • तसेच, या वाहनाचे ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. चांद्रयान-३ मोहिमेत इस्त्रो याचा वापर करेल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Chandrayaan-3good newsInvasion of the Moonisromuktpeethइस्रोचंद्रावर स्वारीचांगली बातमीचांद्रयान-३भारतीय अवकाश संशोधन संस्थामुक्तपीठ
Previous Post

कलाकारांना राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना चित्रकार – शिल्पकारांची कलावंदना!

Next Post

रणांगणात शिवरायांविषयीचे धडे गिरवण्याची संधी, ‘घे भरारी’ प्रदर्शनात ‘मावळा’ बोर्डगेमचा उपक्रम!

Next Post
Mawla board game

रणांगणात शिवरायांविषयीचे धडे गिरवण्याची संधी, ‘घे भरारी’ प्रदर्शनात 'मावळा' बोर्डगेमचा उपक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!