मुक्तपीठ टीम
संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनेत मोठा वाद झाला आणि राज्यातील राजकारण पालटलं. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीत एकत्र लढले मात्र मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला आणि युती तुटली. यानंतर भाजपा आणि शिवसेना संघर्ष आज टोकाला पोहोचला आहे. या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सातत्यानं दिसत आहे. अमित शाहांवरील पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ” महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपाचा मोठा भाऊ हे मिथ संपवण्याचे काम अमित शाह यांनी केले. मोठा भाऊ कोण हे २०१४ मध्ये एकाच निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्रात कळले. मोटा भाई कौन छे, अवघ्या महाराष्ट्राला कळले, असा शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा टोला फडणवीसांनी लगावला.
फडणवीस काय म्हणाले?
मला आठवतयं की २०१४ च्या निवडणुकीमध्ये अचानक शिवसेनेशिवाय लढण्याचा आम्ही निर्णय केला. युतीने लढायचं म्हणून तयारी केली होती. एका दिवसात २८८ जागा लढायच्या आम्ही सगळे थोडे चिंतीत होतो. अमित भाई म्हणाले काळजी करू नका. आपण नक्की निवडणून येणार आहोत. आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई दीड महिना ठाण मांडून मुंबईत बसले. या संपूर्ण निवडणुकीमध्ये दिवसभर कार्यालयात बसून महाराष्ट्रातील सगळी निवडणुक संचलित केल्या. खरं म्हणजे त्याच्यात सभा तर त्यांनी केल्या पण राष्ट्रीय अध्यक्षाच्या केवळ सभा होतात. पण केवळ सभा नाही तर ही निवडणुक योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे म्हणून २४ तास मुंबई मध्ये अमित भाई बसले. आणि त्यांचं प्रत्यंतर आपण बघितलं की एकाच निवडणुकीमध्ये ही जी काही मिथ होतं शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी लहान भाऊ ते एकाच निवडणुकीत बदललं आणि भारतीय जनता पक्षाने १२२ जागा त्याठिकाणी निवडून आणल्या आणि उभ्या महाराष्ट्राला हे कळलं की मोठा भाऊ कोण आहे. मोटा भाई कौन छे? हे महाराष्ट्राला एका दिवसामध्येच त्याठिकाणी समजले.