उदयराज वडामकर / कोल्हापूर
वाढदिवस म्हटलं की गावं जमवून कल्ला करायचा हे तर नेहमीचंच. मात्र, पद्माकर चिंतामण कापसेंनी आपला आणि आपल्या ह्रदयस्पर्शी संस्थेचा अठरावा वाढदिवस वेगळाच साजरा केला. त्यांनी गाई-म्हैशींसारख्या मुक्या जनावरांना चारा घालून आनंद साजरा केला आणि मिळवलाही.
पद्माकर चिंतामणी कापसे यांनी नुकताच त्यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ह्रदयस्पर्शी संस्थेचा अठरावा वाढदिवस साजरा केला. तो साजरा करतानाही त्यांनी आपली सेवाभावी वृत्तीच दाखवली. पद्माकर कापसे हे अखंडितपणे आयुष्य चाळीस वर्ष समाजजीवनात कार्यमग्न असणारे निस्वार्थी निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व. सामाजिक ,धार्मिक शैक्षणिक, सहकार ,राजकीय सांस्कृतिक आणि विधायक अशा सर्व क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने वावरणारे म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी पांजर पोळ मधील मुख्या प्राण्यांना चारा देवुन वाढदिवस आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा केला.
संपूर्ण जीवनात समाजासाठी समर्पित करणारे आहेत. लोकांना आनंद देऊन आनंद मिळवणारे समाजसेवेचे कंकण बांधून झालेले व्यक्तिमत्व आनंदयात्री पदमाकर चिंतामणी कापसे आज यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांनी कोल्हापूरमधील गाई-म्हैशींसाठी चारा प्रदान करून आपला आणि संस्थेचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
त्यांच्याप्रमाणेच समाजामधील इतर लोकांनीही जनावरांसाठी चारा घास द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे..
पाहा व्हिडीओ: