मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँकेत रिस्क मॅनेजर या पदासाठी ४० जागा, क्रेडिट मॅनेजर या पदासाठी १०० जागा, ट्रेझरी सिनियर मॅनेजर या पदासाठी ०५ जागा अशा एकूण १४५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ आणि २ साठी- १) सीए/ सीएमए/ सीएफए किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + एमबीए/ पीजीडीएम (फायनान्स) २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.३ साठी- १) सीए/ सीएमए/ सीएफए किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + एमबीए/ पीजीडीएम (फायनान्स) २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.