Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुर्गसेवकांनी ठरवलं आणि करुन दाखवलं, रामशेज किल्ल्याला प्रवेशद्वार अर्पण!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Entrance gate for ramshej fort

बंधू / मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र म्हटलं की आपला श्वास, आपला ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच! त्यांचे गड – किल्ले म्हणजे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनमोल ठेवा. त्यामुळेच ते प्रेरणादायी वैभव जपण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांचा ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत असते. तळमळीनं प्रसंगी स्वत:च्या खिशातून खर्च करत या तरुणाईनं सळसळणारी संस्था गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन यासाठी सतत-अविरत-अथक प्रयत्नरत असते.

 

नुकतीच त्यांनी बजावलेली कामगिरी रामशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वार बसवण्याची. श्रमिक गोजमगुंडे यांचं “सह्याद्रीचा प्रत्येक दुर्गसेवक हा भगव्याशी प्रामाणिक आहे म्हणूनच त्याची घट्ट नाळ ही सह्याद्रीशी जोडली गेली आहे” हे ट्वीट बरंच काही सांगणारं. त्या भूमिकेतून ते आणि इतर सर्व दुर्गसेवकांनी किल्ले रामशेजच्या प्रवेशद्वाराचीही मोहीम फत्ते केली.

 

किल्ले रामशेजवर बसवण्यासाठी दोन प्रवेशद्वार किल्ल्यावर घेऊन जाणे सोपे नव्हते. ६५ दुर्गसेवकांनी निर्धारानं जोर लावला आणि
दोन दरवाजांचे ४ भाग अवघ्या २८ मिनिटात रामशेजवर पोहचले. १७ एप्रिलला प्रवेशद्वार बसवण्याचा सोहळा पार पडला. त्या सोहळ्यास पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका केलेले अभिनेते दुर्गार्पण सोहळ्यास उपस्थित होते.

 

रामशेज किल्ल्याचा इतिहास…

इतिहासात रामशेज किल्ल्याची नोंद छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंजेबाच्या बलाढ्य फौजांशी दिलेल्या टक्करीसाठी आहे. जास्त बळ आणि साधनं नसतानाही केवळ स्वराज्य रक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी किल्ला लढवला.

 

किल्ल्याला रामशेज नाव का?

  • रामशेज किंवा रामसेज म्हणजे श्री रामचंद्रांचं शयनस्थान.
  • वनवासाच्या काळात श्रीरामांनी या किल्ल्याच्या जागेला आपलं शयनस्थान बनवलं होतं, अशी आख्यायिका आहे.
  • त्यामुळे सेज किंवा शेज म्हणजे पलंग अशा अर्थानं किल्ल्याच्या जागेला रामशेज असं नाव पडलं असावं.

 

रामशेज नेमका कुठे आणि कसा?

  • नाशिक जिल्ह्यातील हा किल्ला नाशिक शहरापासून साडेचौदा किमी अंतरावर आहे.
  • हा किल्ला सिन्रर तालुक्यात नाशिक – पेठ मार्गावरील आशेवाडी गावाजवळ डोंगरमाथ्यावर आहे.
  • हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
  • समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३ हजार २७३ फुट उंचीवर आहे.
  • किल्ल्यावर गुहेमध्ये असणारे श्री रामाचे मंदिर, देवीचे मंदिर, पाण्याचे टाके तसेच कुंड आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Chhatrapati Shivaji MaharajMaharashtraRamshej FortSahyadri DurgasevakSahyadri PratishthanShramik Gojamgundeचांगली बातमीछत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्रमुक्तपीठरामशेज किल्लाश्रमिक गोजमगुंडेसह्याद्री दुर्गसेवकसह्याद्री प्रतिष्ठान
Previous Post

#मुक्तपीठ #LIVE युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची पत्रकार परिषद

Next Post

‘पुष्पा’च्या अल्लू अर्जुनची अस्सल नायकगिरी, कोट्यवधीची पानमसाला जाहिरात नाकारली!

Next Post
Allu Arjun

'पुष्पा'च्या अल्लू अर्जुनची अस्सल नायकगिरी, कोट्यवधीची पानमसाला जाहिरात नाकारली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!