मुक्तपीठ टीम
आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया वापरत आहे, परंतु सोशल मीडियावरील अनेक गोष्टी अचंबित करतात. फेसबुकच्या एखाद्या पोस्टला अचानक लाईक का वाढतात? ट्विटरवर एका ट्वीटला जास्त रिट्वीट कसे मिळतात? हे कुणी उघड करत नसतं. खरंतर हे सर्व ठरवतं सोशल मीडिया अॅप्सचं अल्गोरिदम. मात्र आतापर्यंत कोणत्याच सोशल मीडिया अॅपने हे अल्गोरिदम यूजर्ससमोर उघड केलेले नाही. आता मात्र, ‘कू’ या भारतीय सोशल मीडिया अॅपने आपले अल्गोरिदम यूजर्ससमोर उघड केले आहे.
एक प्रकारे ‘कू’ने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. ‘कू’ अॅपने त्यांचे मूळ अल्गोरिदम उघड केले आहे. यामुळे नेमकं अल्गोरिदम आणि ते कसे कार्य करते याची ओळख करून देणारे ‘कू’ हे पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. हे पाऊल यूजर्सच्या हितावर लक्ष ठेवून उचललं गेलं आहे. तसंच प्लॅटफॉर्मच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी ‘कू’च्या वचनबद्धतेचा प्रत्यय देण्यासाठी उचलले गेले आहे.
अल्गोरिदम माहित असल्याचा काय फायदा?
- अल्गोरिदम यूजर्सना ते कोणतीही कन्टेंट का पाहत आहेत हे जाणून घेण्यास सक्षम करते.
- या अल्गोरिदमवर मार्च २०२२ पासून काम सुरू होते.
- हे अल्गोरिदम गणितीय नियमांचा एक संच आहेत जे यूजर्सना त्यांचे वर्तन आणि प्राधान्यांच्या आधारावर त्यांना कन्टेंटमधून मिळणारे अनुभव त्यांच्या आवडीनुसार आणि सुधारण्यास मदत करते.
- या अल्गोरिदमचे मूळ हेतू म्हणजे यूजर्ससाठी सुसंगतता वाढवणे.
कोणते चार अल्गोरिदम?
- ‘कू’ने चार मुख्य अल्गोरिदमच्या प्रमुख व्हेरिएबल्सची माहिती उघड केली आहे.
- अॅप फीड, ट्रेंडिंग हॅशटॅग (#), लोकांच्या शिफारसी आणि सूचना. हे चार अल्गोरिदम यूजर्स कोणत्या प्रकारची सामग्री पाहतात आणि वापरतात ते ठरवतात.
- या संदर्भात, कू अॅपचे सह-संस्थापक मयंक बिदावतका म्हणाले, “आम्ही आमच्या मुख्य भागधारकांवर म्हणजे यूजर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यावर खूप लक्ष केंद्रित करत आहोत.
- यूजर्ससाठी योग्य निर्माते शोधणे आणि निर्मात्यांना योग्य यूजर्सपर्यंत पोहोचण्यात मदत करणे महत्त्वाचे आहे.
- आमचे अल्गोरिदम हे साध्य करण्यात मदत करतात आणि यूजर्सची प्रासंगिकता लक्षात घेऊन अनेक अनुभव त्यांच्या आवडीनुसार मिळवून देतात.
- आम्ही पारदर्शकतेला आमचा अढळ विश्वास मानतो.
- आमचे अल्गोरिदम उघड करून, आम्ही यूजर्सना आम्ही कू कसं काम करते, हे समजावून सांगण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहोत.