तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी मनसेनं एक टिझर लाँच केला होता. त्यातील “सध्या वारं खूप सुटलय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे” हे विधान ठाण्याच्या सभेसाठी तयार केलेल्या टिझरसाठीही वापरण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात सध्या सुटलेलं वारं हे मनसेचंच आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. अर्थात याचा अर्थ मनसेसाठी राजकीयदृष्ट्या हे वारं सत्तेचं आहे, असं जरी नसलं तरी एक नक्की झालं, कोणत्याही राजकीय चर्चेत केंद्रस्थानी नसलेली मनसे आता सतत चर्चेत आली आहे.
त्याअर्थानं सध्याचं वारं हे मनसेचंच आहे. त्यामुळे आघाडीतील काही पक्ष त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला आक्रस्ताळा म्हणता येईल असा विरोध करताना दिसत आहे. आमदार अमोल मतकरी राज ठाकरेंना खाज ठाकरे म्हणालेत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अर्धवटराव म्हणालेत. हा आक्रस्ताळेपणा कोणाला लाभणार , कोणाला बाधणार हे मांडत मनसेसाठी राष्ट्रवादीची ही आक्रस्ताळी रणनीती बुस्टर डोसचं काम तर करणार नाही, याचा सरळस्पष्ट वेध घेण्याचा हा प्रयत्न: