Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान, वाचा संपूर्ण यादी…

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही - हसन मुश्रीफ

April 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
NCP hasan Mushrif

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करताना कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, असे कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे आयोजित ३४ व्या गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते.

 

यावेळी ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा’स रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार २०१९ देऊन गौरविण्यात आले. रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला २०१९चा कामगार भूषण पुरस्कार राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड पुणे यांना देण्यात आला. तसेच रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने ५१ कामगारांना गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, असंघटीत क्षेत्रातील वाहन चालक, शेतमजूर, ऊसतोड कामगार आदीं असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. संघटीत कामगारांना सुरक्षा असते, कायदेशीर संरक्षण असते मात्र असंघटीत कामगारांच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. असंघटीत कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी राज्य शासन उद्योगधंद्यांच्या आस्थापना ह्या कामगारांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, अशी धोरणे अंगीकारण्यास प्रवृत्त करेल. कुठल्याही देशाचा जीडीपी मालकामुळे न वाढता कामगारांमुळे वाढतो. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.

 

राज्यमंत्री कडू म्हणाले, श्रमावर आधारित योजना निर्माण झाल्या पाहिजेत. कामगारांचे हात बंद पडले की देश बंद पडतो. केंद्राच्या कामगार कायद्याचा कामगारांना फटका बसू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. कामगार मागे राहू नये यासाठी राज्य शासन आपले धोरण अवलंबेल, असे राज्यमंत्री कडू म्हणाले.

 

दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. समारंभापूर्वी मंत्री मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण युग या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविक केले तर सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

 

  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गुणवंत कामगार पुरस्कार सन २०१९
  • रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन २०१९- हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ
  • कामगार भूषण पुरस्कार सन २०१९- राजेंद्र हिरामण वाघ, कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे

 

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सन २०१९

१. श्रीमती नजमाबी गुलाब शेख

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, इचलकरंजी

 

२. श्री. किरण चंद्रकांत देशमुख

अल्फा लवाल (इंडिया) प्रा.लि., दापोडी, पुणे

 

३. डॉ.स्मिता समीर माहुरकर

एल.आय.सी., नागपूर

 

४. श्री. लीलाधर रामेश्वरजी दवंडे

इंडोरामा सिंथेटीक्स (इं), लि., बुटीबोरी, नागपूर

 

५. श्री. हनुमंत रामचंद्र जाधव

लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे

 

६. श्री. संतोष मारोतराव ताजने

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, ऊर्जा नगर, चंद्रपूर

 

७. श्री. किरण राजाराम जाधव

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबई

 

८. श्रीमती महानंदा भगवानराव केंद्रे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परभणी

 

९. श्री सुरेश श्रीनाथराव बोर्डे

बजाज ऑटो लि. वाळूज, औरंगाबाद

 

१०. श्री. कुलदीप जनार्दन सावंत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद

 

११. श्री. बाळासाहेब लिंबराज साळुंके

टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी, पुणे.

 

१२. श्री शिवाजी सुबराव पाटील

टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे.

 

१३. श्री. श्रावण बाबनराव कोळनूरकर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं., औरंगाबाद

 

१४. श्री. पंजाबराव गोविंदराव मोरे

प्रबोधन प्रकाशन प्रा.लि., दैनिक सामना औरंगबाद

 

१५. श्री. योगेश रावण कापडणीस

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं., औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे, नाशिक

 

१६. श्री. राजेश रमाकांत वर्तक

टाटा स्टील लिमिटेड, तारापूर, पालघर.

 

१७. श्री. नितीन रामचंद्र पाटील

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यशाळा चंदनवाडी, मिरज

 

१८. श्री. राजेशकुमार ओंकारमल राजोरे

विदर्भ पब्लिकेशन प्रा. लि. , दैनिक देशोन्नती, अकोला

 

१९. श्री. विठ्ठल सखाराम तांबे

गोदरेज ॲन्ड बॉईज मॅन्यु.कं.लि., शिरवळ, सातारा

 

२०. श्री गजानन कृष्णाजी पिसे

सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील सहकारी साखर कारखाना, लि., अकलूज, सोलापूर.

 

२१. श्री. पंकज गोवर्धनराव ठाकरे

ग्राईंडवेल नॉर्टन लि., बुटीबोरी, नागपूर

 

२२. श्री. संजीव राम माने

कमिन्स इंडिया लि., कोथरूड, पुणे

 

२३. श्री. अरुण वैजनाथ भालेकर

कोहलर पावर इंडीया प्रा.लि. चिकलठाणा, औरंगाबाद

 

२४. श्री. बबन भिकाजी भारस्कर

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., बल्लारशहा, चंद्रपूर

 

२५. श्री. दत्तात्रय पांडुरंग गायकवाड

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे

 

२६. श्री.संजीव आनंदा सुरवाडे

मध्य रेल्वे, विद्युत इंजिन कारखाना, भुसावळ

 

२७. श्री. विलास हसुराम म्हात्रे

नवी मुंबई महानगरपालिका, परिवहन उपक्रम, बेलापूर

 

२८. श्री. तानाजी एकनाथ निकम

कॅनरा बँक, घाटकोपर, मुंबई.

 

२९. श्री. अविनाश एकनाथ दौंड

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई

 

३०. श्री विनोद नारायण विचारे

भारतीय स्टेट बँक, लालबाग, मुंबई

 

३१. श्री. संपत विष्णु तावरे

महानंद दुग्धशाळा, गोरेगांव

 

३२. श्री. सुर्यकांत बाबुराव पदकोंडे

बजाज ॲटो लिमिटेड, बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद.

 

३३. श्री. सखाराम रामचंद्र इंदोरे

गोदरेज ॲन्ड बॉईज कं.लि., विक्रोळी, मुंबई

 

३४. श्री. नितीन रामदास बेनकर

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर-अकलूज, सोलापूर

 

३५. श्री. काळुराम पांडुरंग लांडगे

पुणे महानगर परिवहन महामंडळ, लि.स्वारगेट, पुणे

 

३६. श्री. दिलीप विठ्ठलराव ठाकरे

मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, निरी, नागपूर

 

३७. श्री. इम्रानअली रमजान शिकलगार

किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, सांगली

 

३८. श्री. वैभव हरीश्चंद्र भोईर

ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा, ठाणे

 

३९. सौ. संगीता धनंजय भोईटे

श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था मर्या. फलटण, सातारा.

 

४०. श्री राम बारका सारंग

माझगांव डॉक शिप बिल्डर्स लि., माझगांव, मुंबई

 

४१. श्री. अजय यशवंत दळवी

सिम्बोलिक फॅब्रिक प्रा.लि., भिवंडी, ठाणे

 

४२. श्री. जयवंत यशवंत कुपटे

भारत बिजली लि., ऐरोली, नवी मुंबई

 

४३ श्री. चंद्रकांत महादेव मोरे

बँक ऑफ महाराष्ट्र, परेल शाखा, मुंबई

 

४४. श्री. दिनकर बापु आडसुळ

मेनन पिस्टन रिंग्ज प्रा.लि., संभापुर, हातकंणगले, कोल्हापूर.

 

४५. श्री. दिलीप नामदेव पासलकर

कमिन्स इंडीया लि.कोथरुड, पुणे

 

४६. श्री. विजय संभाजी आरेकर

एस.बी.रिसेलर्स, कागल, एम.आय.डी.सी. कोल्हापुर.

 

४७. श्री. गणेश यशवंत काळे

करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक.

 

४८. श्री संजय शांताराम तावडे

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई

 

४९. श्री. विजय तुकाराम रणखांब

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जिंतुर रोड, परभणी

 

५०. श्री. अशोक सु-याबा आलदर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., विभाग पंढरपूर

 

५१. श्री. बालाजी किसन नलवडे

किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, पलूस, सांगली.


Tags: hasan mushrifNCPमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळराष्ट्रवादी काँग्रेसहसन मुश्रीफ
Previous Post

जयंतरावांचे भावनिक भाषण! प्रतीक जयंत पाटील यांचं राजकीय लॉंचिंग?

Next Post

राज्यात १६२ नवे रुग्ण, १३२ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १६२ नवे रुग्ण, १३२ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!