रॉबिन डेव्हिडसन / सांगली
भव्य दिव्य व्यासपीठ, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, ग्रँड एन्ट्री, मंत्री जयंत पाटील यांच भावनिक भाषण आणि पुत्र प्रतीक यांचे राजकीय लॉंचिंग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली हजारो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.
दोन दिग्गज नेत्यांच्या मुलांची एका वेळी राजकारणात इन्ट्री होणार असून युवा नेते रोहित आर आर पाटील हे तासगाव मधून तर प्रतीक जयंत पाटील हे इस्लामपूर मधून विधानसभा निवडणूक एकाच वेळी लढवणार असल्याची चर्चा आहे. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. भव्य स्वरूपात व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. मोठ मोठे एलईडी स्क्रीन लावले होते. सभेच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती आसमंत उजळून जाईल अशा पद्धतीची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मोठ्या झगमगाटात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नेत्यांची ग्रंड इंट्री शेकडो कार्यकर्त्यांच्या मधून झाली. राष्ट्रवादीचे प्रचार गीत, टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजी या सभेच्या ठिकाणी बघायला मिळाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आमदार आणि जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे भव्य रॅलीने सभेच्या ठिकाणी आले. शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा सुरु झाली आणि प्रत्येक वक्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळत तुम्ही या भागातून बाहेर येऊन राज्यपातळीवर अधिकाधिक लक्ष द्यावे अशी भावना व्यक्त केली. मंत्री जयंत पाटील यांनी, उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. वाळवा तालुक्यातील जनतेने मला हाताच्या फोडा सारख जपलं. सोन्यासारखी माणस होती, म्हणून मला राजकारणात यशस्वी होता आलं. सहकारी संस्था टिकवण्याच काम माझ्या सर्व सहकार्यानी केलं, अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.
तर वाळवा तालुक्यात शंभर टक्के जल सिंचन झाल असून याठिकाणी विकासाचा आणि वैचारिक वारसा जपण्याचे काम स्वर्गीय राजारामबापूंच्या नंतर जयंत पाटील यांनी यशस्वी पद्धतीने केल आहे. जयंत पाटील यांनी या मतदार संघात अशी मशागत केली आहे की पुढच्या पाच पिढ्यांना कोणतीही अडचण नाही, असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केल.
एकीकडे इस्लामपूर मतदार संघातून प्रतीक जयंत पाटील यांचे राजकीय लॉंचिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे या सभेच्या अगोदर सांगलीतील सभेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतीक पाटील यांना सांगलीतून राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी असे जाहीर रित्या मागणी पक्षाकडे केले आहे.
त्यामुळे परिवार संवाद यात्रा राष्ट्रवादीची असली तरी प्रतीक जयंत पाटील यांचे राजकीय लॉंचिंग सुद्धा या निमित्ताने समोर आला आहे.