अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
कॉलेज म्हटलं की फुल टू धमाल…कॉलेज म्हटलं की फेस्टिव्हल तर आलेच. असाच एक फेस्टिव्हल विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजच्या बीएमएम डिपार्टमेंटचा असतो. दर वर्षी नव्या जोशाने नव्या संकल्पनेने बीएमएम डिपार्टमेंटमध्ये माध्यम महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा ‘माध्यमांची ७५ वर्षे’ या संकल्पनेने दोन दिवसीय माध्यम महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थ्यांसह प्रेक्षकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
महोत्सवाच्या तयारीत सारेच समरस!
या महोत्सवाची खरी मजा म्हणजे सर्व आजी-माजी विद्यार्थी या महोत्सवात सामील होतात. महोत्सवाची लगबग ही दोन-तीन महिन्या अगोदरच सुरु होते. सर्व विद्यार्थी एकत्र येत जबाबदारी स्वीकारत काम करतात. रात्र-दिवस कॉलेजमध्ये डेकॉरेशन, डान्स प्रॅक्टिस आणि महोत्सवाची इतर तयारी करत असतात. माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा सर आणि प्रा. रसिका सावंत आणि इतर सर्वच प्राध्यापकही समरसून माध्यम महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असतात. ते विद्यार्थ्यांना आपुलकीनं मार्गदर्शन करत असतात.
एका खोलीपासून महोत्सवापर्यंत…
गजेंद्र देवडा सरांच्या पुढाकाराने आयोजित केल्या जाणारा हा माध्यम महोत्सव आता दहा वर्षांचा झाला. सुरुवातीला महाविद्यालयाच्या एका खोलीत मांडलेलं प्रदर्शन होतं. मात्र नंतर त्याची व्याप्ती आहे ती वाढत गेली. अर्थात याचं श्रेयही त्यांनाच जातं.
ऊर्जा आणि चैतन्याची सळसळ…
माध्यम महोत्सवाची मूळ संकल्पनाही विद्यार्थी केंद्रीतच आहे. विद्यार्थांमध्ये असलेली उर्जा आणखी वाढवणं, त्यांच्यात नवं चैतन्य सळसळवणं या हेतूनेच महोत्सवाचं आयोजन केलं जातं. आणि अर्थातच आहे. हा महोत्सवात अनेक खेळ, स्पर्धा, नृत्य आणि कॉमेडी असते. मुंबईतील अनेक कॉलेजचे विद्यार्थी या महोत्सवात स्पर्धक म्हणून सामील होतात. विजेत्यांना पारितोषिक ही दिलं जात. या महोत्सवात मराठीतील अनेक नामांकित सेलिब्रेटीही हजेरी लावतात. ही संपूर्ण संकल्पना पुढे घेऊन जाण्याचं काम इथले विद्यार्थी करत असतात. अगदी मग ते कॉलेजमध्ये असो, नसो. आपल्या कामातूनही वेळ काढून माजी विद्यार्थीही महोत्सवात त्याच भावनेनं येतात, ज्या भावनेनं गावच्या पारंपरिक यात्रेला जातात. माझंच पाहा ना!
पाहा व्हिडीओ: