मुक्तपीठ टीम
मारुती सुझुकी लवकरच अपडेटेड एर्टिगा आणि XL6 भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. मारुती ब्रेझा १.५ लीटर K15 नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह आणली जाऊ शकते. नवीन इंजिन सुमारे 115bhp पॉवर जनरेट करेल, जे सध्याच्या 104bhp इंजिनपेक्षा थोडे अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही मॉडेल्सनंतर, कंपनी नवीन जनरेशन ब्रेझा लाँच करणार आहे, यामध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरियर सुधारणांव्यतिरिक्त, इंजिनमध्ये बदल केले जाऊ शकतात.
सीएनजीवाली किफायती मारूती ब्रेझा!
- नवीन ब्रेझा फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येऊ शकते.
- CNG मुळे, त्याची फ्युल इफिशियंशी वाढेल, तर त्याची पॅावर आणि टॉर्क कमी होण्याची शक्यता आहे.
- त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडले जाणार.
- सध्या, यात मॅन्युअल तसेच 4-स्पीड एटीसह दिले आहे.
- नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रगत तंत्रज्ञान, स्पोर्ट मोड, मॅन्युअल शिफ्ट पर्यायासह येणार.
सनरुफ आणि Apple आणि Android कनेक्टीव्हीटी!
- नवीन SUV ला सनरूफ, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा आणि पॅडल शिफ्टर्स आहेत.
- टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम 9.0-इंच आकारात वाढवली आहे.
- ही कार Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीला स्पोर्ट करू शकते.
- यात वायरलेस चार्जिंग सिस्टीम, नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑटोमॅटिक एसी युनिट, ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखे फिचर्स नवीन Brezza मध्ये दिली जाऊ शकतात.
पाहा व्हिडीओ: