मुक्तपीठ टीम
टेस्लाचे सीईओ आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क आता ट्विटर विकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी ट्विटरच्या सीईओंची डायरेक्टर बोर्डावर येण्याची ऑफर नाकारली तेव्हाच ही शक्यता व्यक्त झाली होती. कारण त्यासाठी ट्विटरची अट त्यांनी शेअर्सची संख्या १४.४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवू नये, अशी होती. आता तर मस्क यांनी संपूर्ण ट्विटरच विकत घेण्याची ऑफर दिली आहे. ते जर ट्विटरला ताब्यात घेण्यात खरंच यशस्वी ठरले तर नेमकं काय घडेल, काय बिघडले? यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
मस्क यांच्याकडे सध्या ट्विटरचे नऊ टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. ते कंपनीचे सर्वात मोठे भागधारक आहे.ट्विटरने गुरुवारी स्टॉक एक्सचेंजला सांगितले की मस्क यांनी बुधवारी कंपनीचे उर्वरित शेअर्स खरेदी करण्याची ऑफर देणारे पत्र पाठवले. मस्कने प्रत्येक ट्विटर शेअरसाठी५४.२० डॉलरची ऑफर दिली आहे.
एलॉन मस्कची ट्विटरला ऑफर
- एलॉन मस्क यांना ट्विटरमध्येच मोठे बदल करत त्याचे स्वरुप एखाद्या खासगी कंपनीसारखे होणे गरजेचे आहे असे मस्क यांना वाटते.
- ट्विटरचा मालकी हिस्सा विकत घेण्यासाठी मस्क यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलरची ऑफर ट्विटरला दिली आहे.
- “मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली कारण माझा विश्वास आहे की, जगभरात मुक्त अभिव्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठाची गरज आहे.
- माझा असा विश्वास आहे की कार्यक्षम लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही सामाजिक गरज आहे.
- असे मस्क यांनी स्टॉक एक्सचेंज ब्रीफिंगमध्ये सांगितले.
- ते पुढे म्हणाले, माझी गुंतवणूक केल्यापासून मला आता समजले आहे की सध्याच्या स्वरूपात कंपनीची भरभराट होणार नाही किंवा कंपनी सामाजिक गरजांची पूर्ततादेखील करू शकणार नाही.
- त्यामुळेच ट्विटरला एखाद्या खासगी कंपनी म्हणून बदलण्याची गरज आहे.
- ही माझी सर्वोत्कृष्ट ऑफर आहे आणि ही अंतिम ऑफर आहे. ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीवर पुनर्विचार करावा लागेल,” असा एक प्रकारे मस्क यांनी ट्विटरला इशाराच दिला आहे.
जर खरोखर ते तसं करू शकले तर ते म्हणतात तसे ट्विटरला काळानुसार अधिक बदलत अधिक सळाळतं बनवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेकांना भीती वाटते ती एलॉन मस्क यांच्या कार्यशैलीमुळे ट्विटरवरील स्वातंत्र्य धोक्यात येण्याची.