मुक्तपीठ टीम
कबड्डी कबड्डी…सतत येणारा आवाज. कबड्डी खेळाडूंचा जोश वाढवणारा प्रेक्षकांचा तसाच उत्साही प्रतिसाद. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात नानाशेठ खोरात क्रीडांगणावर रोजच सध्या उत्साही आणि उत्सवी वातावरण आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा रंगते आहे.
जिजाऊ चषक २०२२ च्या भव्य कबड्डी स्पर्धेचा उदघाटन शिवसेनेचे विधानपरिषेदेतील आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळीं प्रमुख पाहुणे म्हणून भगवान सांबरे (बाबा), भावनादेवी सांबरे (आई), जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदयी वाढाण, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष पंडित पाटील, विक्रमगड नगराध्यक्ष पिंका पडवले, जि. प सदस्य संदेश ढोणे, हबिब शेख, पंकज देशमुख, जेष्ठ पत्रकार शरद पाटील, वाडा पंचायत सभापती रघुनाथ माली, डहाणू पंचायतच्या सभापती स्नेहलता सातवी, नानाशेठ थोरात व आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सौ. हेमांगी पाटील, सौ. मोनिका पानवे, शशिकांत पाटील, महेंद्र ठाकरे, डॉ गिरीश चौधरी, कैलास पाटील, अरविद ठाकरे, दिनेश पाटील, अरविंद देशमुख, मोजम पटेल आदी जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या स्पर्धेचा उदघाटनीय सामना मुंबई महानगरपालिका विरुद्ध सेंट्रल रेल्वे या दोन संघात पहिला सामना अतिशय रोमहर्षक झाला. यांमध्ये ३१ विरुद्ध २८ गुणांनी सेंट्रल रेल्वे संघाने विजय मिळवला.
या स्पर्धेत पुणेरी पलटण, संजय घोडावर उद्योग समूह कोल्हापूर, इनकम टँक्स पुणे, सी.जी. एस. टी. मुंबई, पुणे आर्मी, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र पोलीस, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, सेंट्रल रेल्वे या महाराष्ट्र राज्यातील १२ व्यवसायिक संघात दमदार असे सामने झाले..
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३,३३,३३३ रुपये, द्वितीय पारितोषिक २,२२,२२२ रुपये तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ६६,६६६ रुपये असणार आहे.
तर मालिकवीर ठरणाऱ्या खेळाडूला बाईक असणार आहे. तर लकी ड्रॉ द्वारे एका भाग्यवान प्रेक्षकांला पहिल्याच दिवशी सायकल देण्यात आली
आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून अप्पांचं कौतुक!
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे संपूर्ण कोकणात सामाजिक उपक्रम राबवतात त्याचा सार्थ अभिमान वाटतो, व एवढ्या मोठ्या भव्यदिव्य स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन मिळून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, निलेशजी तुमच्या प्रत्येक सुख दुःखात आम्ही सदैव सोबत आहोत, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक म्हणाले.