मुक्तपीठ टीम
दक्षिण कोरियन KIA हा ऑटोमोबाइल ब्रँड आता लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Kia सध्या Sonet, Seltos, Carnival आणि Carens सारख्या फक्त इंटर्नल कम्बशन इंजिन कार विकते. Kia लवकरच भारतात EV6 लाँच करणार आहे. कंपनी सध्या EV6 भारतात कंप्लिट बिल्ट युनिट विकू शकते. युरोपियन देशांमध्ये Kia EV6 ची किंमत सुमारे ४५,००० युरो आहे. Kia ने CBU मार्गाने EV6 भारतात विकल्यास, त्याची किंमत सुमारे ६० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. Kia कार अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने फक्त १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.
कधी होणार भारतात लाँच
- या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर कारची सध्या तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये चाचणी सुरु आहे.
- Kia EV6 GT चा अवतार देखणा दिसतो.
- Kia EV6 भारतात वर्षाच्या आखेरीस लाँच केली जाऊ शकते.
- लाँच होताच, ही कार Tata Nexon EV, MG ZS EV आणि आगामी Hyundai IONIQ 5 सारख्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
बॅटरी आणि रेंज फिचर्स
- टॉप-स्पेक EV6 GT वारिएंटमध्ये 77.4 kWh चा शक्तिशाली बॅटरी पॅक आहे.
- ही कार ३२० बीएचपी पॉवर आणि ६०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
- GT व्हेरियंट ड्युअल इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येईल.
- Kia EV6 एका पूर्ण चार्जवर ४२५ किमी अंतर कापू शकते.
- Kia कार अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने फक्त १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.
व्हेरियंट्स
- Kia EV6 इलेक्ट्रिक SUV कार निर्मात्याच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (e-GMP) वर आधारित आहे
- ही कार युरोपियन बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- जागतिक बाजारपेठेत, Kia EV6 तीन प्रकारांमध्ये ऑफर केली जात आहेट
- EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT.
- ते 510 किमी पेक्षा जास्त श्रेणीसाठी दोन बॅटरीसह आणि ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह उपलब्ध असतील.
- GT फक्त अधिक शक्तिशाली बॅटरी पॅकसह ऑफर केली जात आहे.
- EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWS) सह उपलब्ध आहे.