मुक्तपीठ टीम
आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.
सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश…
- ५७ कोटी जमवल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.
- १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
- तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
किरीट सोमय्यांचं ट्वीट –
I thank Mumbai High Court for granting Interim Relief/Bail.
Thackeray Sarkar not produced a single document of ₹57 Crore Vikrant Scam. They are exposed
Our fight against the “Ghotalebaj” Maharashtra Govt will continue till the Dirty Dozen of Thackeray Sarkar gets punishment
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 13, 2022
- न्यायालयाने दिलासा देताचा इतक्या दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोमय्यांनी ट्वीट केले आहे.
- “अंतरिम दिलासा/जामीन दिल्याबद्दल मी मुंबई हायकोर्टाचे आभार मानतो.
- ठाकरे सरकार ५७ कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचा एकही कागद सादर करु शकलेलं नाही.
- ते उघड पडले आहेत. जोपर्यंत ठाकरे सरकारच्या डर्टी डझनला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत या घोटाळेबाज सरकारविरोधात आमचा लढा सुरु राहील.