मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या अणुउर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी भरती केली जाणार आहे. संस्थेने ७ एप्रिल २०२२ रोजी भरतीची जाहिरात जारी केली आहे. एमटीएसच्या ३१ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.
तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अधिक माहितीसाठी प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकृत वेबसाइट ipr.res.in वरून माहिती मिळवू शकता.