मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे दिवंगत नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल हे काँग्रेसला रामराम करण्याची चर्चा आहे. यासंदर्भात फैजल पटेल यांनी ट्वीट करत मी वाट बघून थकलो आहे, असे म्हटले आहे. हायकमांडकडून कोणतेही प्रोत्साहन मिळालेले नाही. मी माझ्या बाोजून सर्व पर्याय खुले ठेवले आहे. ते आम आदमी पक्षात सामील होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कारण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फैजल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.
अहमद पटेल यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये निधन
- अहमद पटेल यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.
- पटेल हे सोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते.
- ते सोनिया गांधींचे राजकीय सल्लागारही होते.
- अहमद पटेल यांनी त्यांचा मुलगा फैसल आणि मुलगी मुमताज यांना राजकारणापासून दूर ठेवले.
- मात्र आता त्यांची मुले इच्छा व्यक्त करत आहेत.
- त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी फैजल यांनी म्हटले होते की, मला माहित नाही की ते राजकारणात सहज प्रवेश करू शकतील की नाही.
- ते म्हणाले की, ते पडद्याआड काँग्रेससाठी काम करत आहे.
फैसल यांचा भरूच आणि नर्मदा दौरा!
- फैजल सध्या भरूच आणि नर्मदा जिल्ह्यातील ७ विधानसभा जागांच्या दौऱ्यावर आहे.
- माझी टीम सध्याच्या राजकीय परिस्थितीचे मुल्यांकन करेल आणि आमची मुख्य उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास मोठे बदल करेल.
- देवाच्या इच्छेने आम्ही सर्व ७ जागा जिंकू.
- मी सध्या राजकारणात येण्याविषयी ठाम सांगू शकत नाही.
स्टर्लिंग बायोटेक प्रकरणी अहमद पटेल यांच्या पुत्रावर गेली होती ईडीची नजर!
फैजल पटेल यांना २०१९च्या सप्टेंबरमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईडीने त्याच वर्षी जुलै महिन्यात अहमद पटेल यांचे जावई इरफान सिद्दीकी यांचेही बयाण नोंदवले होते. गुजरातस्थित स्टर्लिंग बायोटेक या कर्ज घोटाळ्यातील संदेसरा बंधूंसोबत अहमद पटेल यांचा मुलगा आणि जावई यांच्या संबंधांची आणि व्यवहारांची ईडी चौकशी केल्याच्या बातम्या आल्या होत्या.
अर्थात आताचं त्यांचं विधान आणि ईडीची चौकशी याचा काही संबंध असल्याचं स्पष्ट नाही. पण काँग्रेसपासून दूर गेलेल्या अनेक नेत्यांच्याबाबतीत असं झाल्यानं तशी चर्चा मात्र झाली.