Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“फोटोग्राफरने सर्जनशील, उपक्रमशील बनावे” – खासदार डॉ. अमोल कोल्हे

April 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
Respect Honors Ceremony in the presence of Amol Kolhe

मुक्तपीठ टीम

“आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचे चित्रण करण्याचे काम फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर करतात. त्यांच्या नजरेतून टिपलेला प्रत्येक क्षण यादगार बनतो. त्यामुळे फोटोग्राफर्सनी आपल्यातील सर्जनशीलतेला उपक्रमशीलता आणि डिजिटल माध्यमाची जोड द्यावी,” असे मत खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
Respect Honors Ceremony in the presence of Amol Kolhe
रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स, महाराष्ट्र यांच्यातर्फे चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात ‘रिस्पेक्ट सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ‘मिशन माणुसकी’चे संस्थापक लोकशाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ फोटोग्राफर रंजन झिंगाडे, पुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे, फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Respect Honors Ceremony in the presence of Amol Kolhe
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे काम चित्रण करणाऱ्याचे असते. फोटोग्राफीचा व्यवसाय करताना बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे. स्वतःसह कुटुंबाचा आरोग्य विमा, उपकरणांचा विमा आणि आपण टिपलेल्या चित्रांचाही विमा, तसेच कॉपीराईट काढला पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘रिस्पेक्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून उपक्रम राबवले जात आहेत, याचा आनंद वाटतो.”
संभाजी भगत म्हणाले, “आपल्या सन्मानासाठी चळवळ उभारताना अनेकदा अडचणी येतात. मात्र, संयम आणि चिकाटीने त्याचा सामना करत चळवळ व्यापक करायला हवी. फोटोग्राफर उघड्या डोळ्यांनी समाजाचे चांगले-वाईट चित्रण करत असतो.”
Respect Honors Ceremony in the presence of Amol Kolhe
सचिन भोर म्हणाले, शिक्षणातून सन्मान आणि समृद्धी या उद्देशाने फाउंडेशन काम करत आहे. वेडिंग फोटोग्राफर्सना सन्मान मिळावा, या भावनेतून या चळवळीची सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात अनेक उपक्रम, कार्यशाळा घेण्यात आले.”
रंजन झिंगाडे यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील अनुभव व वेडिंग फोटोग्राफीतील कलात्मकता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अभय काप्रे यांनी आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.

Tags: dr amol kolheडॉ.अमोल कोल्हेमहाराष्ट्ररिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्सरिस्पेक्ट सन्मान
Previous Post

दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची १६ एप्रिलला चैत्र यात्रा

Next Post

दुसऱ्या भाषेचा द्वेष नको, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Marathi Bhasha bhavan

दुसऱ्या भाषेचा द्वेष नको, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!