मुक्तपीठ टीम
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा १६ एप्रिल रोजी भरणार आहे. चैत्र यात्रेसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. दरम्यान या यात्रेवेळी सासन काठीची उंची कमी करण्यासाठी प्रशासनाची बैठक झाली.
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनामुळे सलग दोन वर्षे झालेली नाही. परिमाणी गावकरी, पुजारी आणि दुकानदार यांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर १६ एप्रिल रोजी यात्रा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरु केली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपातून यंदा चैत्र यात्रेत दर्शन रांग केली जाणार आहे.
चैत्र यात्रेच्या अनुषंगाने व्यापारी, सासनकाठी धारक, स्थानिक पुजारी व प्रशासन बैठक झाली. यामध्ये यात्राकाळात खोबऱ्याचे लहान तुकडे करून उधळावे, यात्रेला अडथळा होऊ नये, दुकाने रचना असावी तसेच प्लास्टिकचा वापर टाळावा पदार्थांमध्ये भेसळ टाळावी हुल्लडबाजी वर नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेकडून सूचना करण्यात आल्या. पुजाऱ्यांना स्वतंत्र कुलाचार विधी मार्ग ठेवण्यात येणार या बैठकीमध्ये प्रांताधिकारी ,तहसीलदार, देवस्थान समिती सचिव ,सरपंच, कोडोली पोलीस ठाणे उपनिरीक्षक तसेच पुजारी, व्यापारी उपस्थित होते.