मुक्तपीठ टीम
देशात परिस्थिती वेगळी होत आहे, देशात धर्माच्या नावाने लोकांच्यात आंतर निर्माण केले जात आहे. अशा धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल, अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात पवार हे बोलत होते. ऊस शेतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा अतिरिक्त ऊसाचे गळीत आता कस करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे, ही स्थियी चिंताजनक असून ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे, असं ही शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान भाजपाचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाईक यांच्या राष्ट्रवादीत घर वापसीमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
ज्यानी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले, त्यांच्यावर दुर्दैवाने टीका करणारे देशात नेतृत्व आहे, अस सांगून पवार पुढे म्हणाले, शेजारच्या राज्यात अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा चूकीचा निर्णय घेतला आहे, तो धोकादायक प्रकार आहे.
ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे.फक्त ऊसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उप पदार्थ करावे लागतील अस ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
बोलत नाही, करून दाखवतो!- जयंत पाटील
- रोज भाजप म्हणतंय की आमच्यातून दोन आमदार फुटणार पण तसं काही होत नाही.
- उलट आम्ही बोलत नाही, करून दाखवतो.
- आज माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.
- २०२४ च्या आत सांगली जिल्ह्यातील एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही प्रशासकीय निर्णय घेतले आहेत.