मुक्तपीठ टीम
चेहऱ्यावरचे मास्क गेले आणि आता कोरोना खरोखरच आटोक्यात आल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मात्र, त्याचवेळी मास्कआडचे चेहरे जसे दिसू लागले, तसेच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसीएमआरच्या पुणे स्थित राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था NARIने दिलेली माहिती धक्कादायक आहे. रेमडेसिव्हिरसह ज्या पाच औषधांसाठी लोक त्रासले, ती कोरोनाविरोधात तेवढी उपयोगी नव्हतीच, असे अभ्यासातून दिसून आलं आहे.
पुण्यातील संस्थेनं केला अभ्यास
- कोरोना संकटात रेमडेसिव्हिर, हायड्रोक्लोरोक्वीन, लोपिनाविर, रिटोनाविर आणि इंटरफेरोन या पाच प्रमुख औषधांची खूप चर्चा झाली.
- रेमडेसिव्हिरचा तर काळाबाजारही झाला.
- आयसीएमआरच्या पुण्यामधील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेने (NARI) देशातील २०-३० केंद्रांवर कोरोना रुग्णांवर या पाच प्रमुख औषधांच्या परिणामांचा अभ्यास केला.
- सुमारे एक हजार कोरोना रुग्णांवर अभ्यास केला गेला.
- ही औषधे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जात होती.
औषधांचा परिणाम जाणवला नाही!
- ही अँटीव्हायरल औषधे आधीच अस्तित्वात होती आणि जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना उपचारांसाठी त्यांचा उपयोग केला होता.
- खरंतर तसं करण्यामागे कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नव्हता.
- ही औषधे रुग्णांचे प्राण वाचवण्यास सक्षम नाहीत आणि आजार चिघळण्यापासूनही वाचवू शकत नाही.
- ही औषधे घेणारे लोकही व्हेंटिलेटरवर होती.
- पुढे सरकारने ही औषधे कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलमधून काढून टाकली.
- पण तोपर्यंत लोकांची शेकडो कोटींची लूट झाली असावी.