मुक्तपीठ टीम
ब्लॅक शार्कने बुधवारी ब्लॅक शार्क 5 प्रो गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. फोनच्या मागील भागात फॅन्सी SharkEye RGB लाइट इफेक्ट आणि DXOMark चा टॉप-रँक असलेला स्पीकर आहे. कंपनीचा दावा आहे की फोन १५ मिनिटांत चार्ज होतो. तसंच या स्मार्ट फोनला सुपर म्हणता येईल असं आणखी एक फिचर म्हणजे १६ जीबी रॅम आहे.
- ब्लॅक शार्क 5 प्रो ची किंमत 8GB+25GB व्हेरियंटसाठी $६६१ (५०,०००),
- 12GB+256GB व्हेरिएंटसाठी $७४० (५६,०००)
- 16GB+512GB व्हेरियंटसाठी ८६६ (६६,०००) डॉलर आहे.
- हा फोन मिटीओर आणि टियानगोंग पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.
- हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि २ एप्रिलपासून ऑफलाइन-ऑनलाइन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- ब्लॅक शार्क स्टोअर्स, Xiaomi स्टोअर्स आणि JD.com सारख्या इतर अधिकृत स्टोअरमधून हा फोन खरेदी केला जाऊ शकतो.
ब्लॅक शार्क 5 प्रो चे काही खास फिचर्स
- ब्लॅक शार्क 5 प्रो 144Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच FHD+ (2400 x 1080 पिक्सेल) रिझोल्यूशन डिस्प्ले आहे.
- यात OLED पॅनेल आहे ज्याची 1300 nits ब्राइटनेस आहे.
- यात HDR10+ सपोर्ट आणि 1.07 अब्ज रंग आहेत.
- स्क्रीनमध्ये 720Hz टच सॅम्पलिंग रेट आहे आणि यात ड्युअल-झोन प्रेशर-सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे
- डिस्प्लेमध्ये SGS ब्ल्यू-रे सर्टिफिकेशन आणि 8.3ms मल्टी-फिंगर टच प्रतिसाद विलंब देखील आहे.
- हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे
- 16GB पर्यंत LPDDR5 आणि 512GB डिस्क अॅरे 2.0 सह आहे.
- डिस्क अॅरे कार्यक्षमतेने UFS 3.1 आणि SSD चा स्पीड आहे. -वाचन आणि लेखन गती अनुक्रमे 55% आणि 69% ने वाढली आहे.
- फोनला AnTuTu स्कोअर चाचणीत १,१२९,७१६ गुण आहेत.
- हा गेमिंग फोन असल्याने, यात लिफ्ट-अप शोल्डर ट्रिगर आहे जो गेमिंगचा चांगला अनुभव देईल.
- यात 108MP Samsung S5KHM2 मुख्य लेन्स, 13MP OmniVision OV13B10 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP Samsung S5K5E9 टेलीफोटो लेन्ससह तीन कॅमेरा सिस्टम आहे.
- सेल्फीसाठी 16MP OmniVision OV16A1Q सेन्सर आहे.
- फोनमध्ये 4650mAh बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.
- हा फोन अवघ्या १५ मिनिटांत फुल चार्ज होणार.
- हा फोन स्पीकर सेटअपसह उपलब्ध आहे ज्याने DXOMARK ऑडिओ चाचणीत ८६ गुण मिळवले आहेत.
- हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 OS वर बूट होतो आणि जॉययूआई १३ आहे.