मुक्तपीठ टीम
साठ्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर यांना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान लाभला आहे. मुंबईतील ठाकूर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्कार समारंभामध्ये त्यांना ‘उत्कृष्ट आय. क्यू. ए. सी. समन्वयक’ हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील मानाचा समजला हा पुरस्कार म्हणजे प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर यांच्या शिक्षण सेवेचा गौरव मानला जातो.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर यांना ‘उत्कृष्ट आय. क्यू. ए. सी. समन्वयक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुधीर पुराणिक, ठाकूर शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री. ठाकूर जितेंद्र सिंह, प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती, ट्रस्टी रमेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. मुंबईतील ललित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात देशभरातील शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या विभागात आणि वेगवेगळ्या स्तरांवर महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या २४ विद्वानांचा सत्कार करण्यात आला. या विशेष उपलब्धीबद्दल प्रा. डॉ. नेरकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.