Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीसीटीव्ही फुटेजमुळे म्हाडा परीक्षेतील गैरव्यवहार उघड! गुणवत्ताधारकांच्या भविष्याशी खेळ कधी, कसा थांबणार?

March 31, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
Mhada Exam Scam

मुक्तपीठ टीम

सरकारी नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार कसा होतो ते दाखवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या परीक्षा केंद्रावरील हे फुटेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘साम’ या मराठी न्यूज चॅनलने म्हाडा परीक्षा सीसीटीव्ही फुटेज उघड केले आहे. औरंगाबादच्या एका परीक्षा केंद्रावरील मालकाशी संगनमत करून ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या प्रणालीत फेरफार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा आरोप होत आहे. एमपीएससी समन्वय समितीनेही ट्विटरवर या विषयावर सरकारचे लक्ष वेधत गुणवत्ताधारकांच्या भविष्याशी चालणारा खेळ थांबवण्याची मागणी केली आहे.

म्हाडा परीक्षेत घोटाळा कसा झाला घोटाळा.थेट विद्यार्थ्याशेजारीच बसलाय सुपरवायझर- सीसीटिव्ही कॅमेऱाला दिसतंय ते सरकार पाहणार का? @saamTVnews @Mpsc_Andolan @PuneCityPolice @Awhadspeaks . https://t.co/NZav947Ghi pic.twitter.com/ab8BwFR4O2

— Prachee PS (@prachee_ps) March 30, 2022

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?

  • ‘साम’ या मराठी न्यूज चॅनलने म्हाडा परीक्षा सीसीटीव्ही फुटेजची बातमी सर्वप्रथम चालवली.
  • त्यानंतर एमपीएससी समन्वय समितीनेही ट्विटरवर या विषयावर सरकारचे लक्ष वेधले आहे.
  • समन्वय समितीच्या हँडलवरून काही सीसीटीव्ही फुटेजही मांडण्यात आले.
  • औरंगाबाद परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज धक्कादायक आहे.
  • समोर आलेल्या फुटेजनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्राचा मालक, सुपरवाझर आणि काही उमेदवार केंद्रामध्ये शिरताना दिसत आहेत.
  • परीक्षेच्या आधीच ते परीक्षा केंद्रात जाताना दिसत आहे.
  • त्यांनी ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सची छेडछाड केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे.
  • खरंतर नियमांनुसार परीक्षेच्या आधी परीक्षा केंद्र एजन्सीच्या ताब्यात असतं तरीही औरंगाबादच्या ‘मौर्य इन्फोटेक’ या परीक्षा केंद्रावर हे घोटाळेबाज कसे घुसले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  • परीक्षा केंद्रात घुसलेल्या या लोकांनीच पेपरही लीक केल्याचा आरोप केला जात आहे.
  • धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रावर सुपरवाझर उमेदवाराच्या शेजारी बसून त्याला परीक्षेची उत्तरं सांगताना दिसतो आहे.

 

https://t.co/4NV57VVQka

म्हाडा भरती घोटाळा व्हिडिओ : पहिला

विद्यार्थ्याची परीक्षा ९ तारखेला आहे तरीही तो ५ तारखेला अनधिकृत रित्या परीक्षा केंद्रात जाताना आपण बघू शकतो.@Awhadspeaks@CMOMaharashtra @DGPMaharashtra

— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) March 30, 2022

आता तरी परीक्षा खऱ्याखुऱ्या फुलप्रूफ होणार का?

  • या संपूर्ण प्रकरणानंतर म्हाडा आणि अन्य स्पर्धा परीक्षा अशाच घेतल्या जाणार का, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे.
  • गुणवंतांच्या भविष्याचे निकाल लावणाऱ्या अशा परीक्षा घेवू नयेत, सुरक्षित पद्धत आवश्यक, असं मत व्यक्त होत आहे.
  • एमपीएससी समन्वय समितीनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तसे प्रश्नही केले आहेत.
  • म्हाडाची परीक्षा व्हायच्या एक दिवस आधी इथल्या पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा अचानक रद्द केल्याची घोषणा केली होती.
  • ऐनवेळी पेपर रद्द झाल्यानं उमेदवारांना थोडासा त्रास सहन करावा लागेल पण यापुढे जी परीक्षा होईल ती फुलप्रुफ असेल असा दावाही करण्यात आला होता.
  • आता त्यांचे ते शब्द प्रत्यक्षात आणणारी परीक्षा पद्धती अस्तित्वात यावी, अशी अपेक्षा तरुणाईकडून व्यक्त होत आहे.

Tags: AurangabadCCTV Footagejitendra awhadMHADA examऔरंगाबादजितेंद्र आव्हाडम्हाडा परीक्षासीसीटीव्ही फुटेज
Previous Post

पालघरमधील पत्रकारांच्या आंदोलनाला यश, मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या मागण्या मान्य!

Next Post

#मुक्तपीठ LiVE राज्यसभेतून ७२ खासदारांची निवृत्ती…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांची भाषणं

Next Post
#मुक्तपीठ LiVE राज्यसभेतून ७२ खासदारांची निवृत्ती…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांची भाषणं

#मुक्तपीठ LiVE राज्यसभेतून ७२ खासदारांची निवृत्ती...पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांची भाषणं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!