मुक्तपीठ टीम
जोडीदारावर विवाहबाह्य आरोपांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. जोडीदारावर विवाहबाह्य संबंधाचा बिनबुडाचा आरोप हा जोडीदाराच्या चारित्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि आरोग्यावर गंभीर आघात करणारा असतो. त्यामुळे मानसिक त्रास होतो, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे आरोप म्हणजे क्रूरतेच्या बरोबरीचे आणि घटस्फोटाचे कारण देखील असू शकते. न्यायालयाने म्हटले की, विवाहबाह्य संबंधांचे आरोप गंभीर असतात, ते अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने एका महिलेची याचिका फेटाळताना आपल्या निकालात ही निरक्षणे नोंदवली.
महिलेचे पती व सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप…
- कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३(१)(आयए) अंतर्गत पतीच्या बाजूने घटस्फोट घेण्याचा आदेश दिला होता.
- न्यायालयाने महिलेचे आरोप निराधार मानले.
- महिलेने पतीवर गंभीर आरोप लावले आहेत, तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, तो दारू पितो आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडतो.
- महिलेने सासरच्या मंडळींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून, घरातील इतर सदस्य हुंड्यासाठी छळ करत आहेत.
- मात्र, सुनावणीवेळी यातील एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.
- लग्न हे एक पवित्र नाते आहे, त्याची शुद्धता ठेवण्याची गरज आहे. अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही क्रूरता आहे.
- त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयामध्ये दखल देण्याचे आम्हाला काहीही कारण दिसत नाही, असे न्यायमूरातींनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
- २०१४ साली या जोडप्याचे लग्न झाले होते.
- लग्नाच्या काही काळानंतर दोन्ही पक्षांमधील परस्पर संबंध बिघडले होते.
- २०१७ मध्ये पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटोसाठीअर्ज केला होता.
- जो २०१९ मध्ये संजूर झाला.
- ही महिला सामाजिक विज्ञान शिक्षिका असून तिचा पती एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगितले जात आहे.