Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ११ महिला ‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्काराने सन्मानित

देशातील एकूण ७५ महिलांना पुरस्कार प्रदान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Women transforming India Award

मुक्तपीठ टीम

विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना ‘भारत बदलणा-या महिला’ (Women Transforming India) या पुरस्काराने निती आयोगातर्फे सोमवारी सायंकाळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ महिलांचा समावेश होता. देशातील एकूण ७५ महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

निती आयोगच्यावतीने ‘भारत बदलणा-या महिला’ (Women Transforming India) या ५व्या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रशसंनीय कार्य करणाऱ्या ७५ महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सल्लागार अण्णा राय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले.

 

माजी पोलीस महासंचालक तथा पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी, माजी सहायक महासचिव संयुक्त राष्ट्र लक्ष्मी पुरी, डीआरडीओच्या एरोनॉटीकल सिस्टमच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरूंदती भट्टाचार्य, नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, अभिनेत्री आणि लोक गायीका इला अरूण, यासह ट्रॅक आणि फिल्ड ऍथलीट शायनी‍ विल्सन, टोक्यो ऑलिम्पिक विजेती मुष्ठियोद्धा लवलीना बोरगोहेन, जागतिक प्रथम क्रमांची पॅरा बॅडमिटंनपटू मानसी जोशी, टोक्यो ऑलिम्पियन जिम्नॅस्ट प्रणीती नायक, मुष्ठियोध्दा सिमरनजित कौर यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

महाराष्ट्रातील ११ महिलांना ‘भारत बदलणा-या महिला’ पुरस्कार

मुंबईच्या डॉ. अर्पणा हेगडे, या अरमान नावाने गैरशासकीय संस्था चालवितात. या संस्थेच्यावतीने गर्भवती माता, नवजात अर्भक आणि पाच वर्षापर्यंतच्या बालकांची काळजी घेतली जाते. आतापर्यंत २७ लाख माहिला आणि बालकांना त्यांनी आवश्यक ती मदत पुरविली आहे. ही संस्था १९ राज्यात काम करते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या किलकारी आणि मोबाईल अकादमी या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी अरमानच्या माध्यमातून केली जाते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

नागपूर जिल्ह्यात क्रांती ज्योती महिला बचत गट (रूलर मार्ट)चालविणाऱ्या दिपा चौरे आहेत. यांच्या बचत गटाच्यामाध्यमातून ग्रामीण भागात उच्च गुणवत्तेचे उत्पादन तयार केली जातात. त्यांनी ३५० ते ५०० महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकरीत्या सक्षम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनाही सन्मानित करण्यात आले. या बँकेचे लक्ष्य वर्ष २०२४ पर्यंत १० लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे आहे.

 

मुंबईतील रीसिटी नेटवर्क प्रा. ली. च्या मेहा लाहीरी या स्वच्छता यावर काम करतात. प्लास्टिक कचरा हे आजचे आव्हान असून त्याशी निगडीत काम करणा-या कामगारांचे समुपदेशन, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. संस्था स्थापनेपासून ६९% पेक्षा जास्त महिला कचरा कामगारांवर संस्थेने केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या याइकामाची दखल घेत त्यांना ‘भारत बदलणा-या महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

पुणे येथील स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रेमा गोपालन यांनाही सन्मानित करण्यात आले. त्या पुरस्कार स्व‍िकारायला येऊ शकल्या नाही परंतू त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधीने हा पुरस्कार स्व‍िकारला. त्यांनी संस्थेच्या माध्यातून बदलत्या नैसर्गिक वातावरणानुसार ग्रामीण भागात महिलांना शेती करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांची संस्था महाराष्ट्र, केरळ, बिहार, ओरिसा या राज्यांतही काम करते. त्यापर्यंत त्यांनी १५०,००० ग्रामीण महिला शेतकऱ्यांना प्रशिक्ष‍ित केलेले आहे.

 

पुण्यातील आदया ओरीजनल्स प्रा. ली. संस्थेच्या सायली मराठे यांना त्यांच्या ऐतिहासिकपणा जपणाऱ्या चांदीच्या दागीने बनविण्याच्या कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

मुंबईच्या शांती राघवन या अनऐबल इंडिया गैरशासकीय संस्थेच्यामाध्यमातून दिव्यांगासाठी मागच्या २ दशकांपासून काम करतात. देश घडविण्यात दिव्यांगाची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या करातून नवनवीन प्रकल्प उभारले जातात. दिव्यांगाचे अस्तित्व अन्यसारखेच महत्वाचे असल्याचे अधोरेखित त्या करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांनाही ‘भारत बदलणाऱ्या महिला’ या पुरस्काराने सन्‍मानित करण्यात आले.

 

मुंबईतील टिच फॉर इंडिया आणि द आकांक्षा फाउंडेशन च्या माध्यमातून शाहीन मिस्त्री या वर्ष २००८ पासून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी काम करीत आहेत. आजपर्यंत या संस्थेने ३२ हजार मुलांना टिच फॉर इंडियाच्या माध्यमातून शिक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे ३३ दक्षलक्ष बालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाही.

 

पुण्याच्या सुलज्जा मोटवानी यांनी प्रदुषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी काइनेटिक ग्रीन एनर्जी ॲण्ड पावर सोलुश्यन या कंपनीच्या माध्यातून प्रदुषण कमी करणारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात असणारे वाहन तयार केले. या वाहनाची किंमतही परवडण्यासारखी ठेवली. त्यांचा लाभ लोकांना होत आहे. यामाध्यमातून आतापर्यंत ५० हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. यासह मुंबईच्या फुट डॉक्टर पायांची निगा कशी राखायची बद्दलची माहिती कलर मी मॅड प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून त्रिशला सुराणा देत असतात. यांना आणि मुंबईच्याच ओखई या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांना रोजगार देणाऱ्या किर्ती पुनिया यांनाही सन्मानित करण्यात आले मात्र, याही कार्यक्रमात उपस्थित होऊ शकल्या नाहीत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Amrit Mahotsavi yeargood newsMaharashtra WomenmuktpeethWomen transforming India Awardअमृत महोत्सवी वर्षचांगली बातमीभारत बदलणाऱ्या महिला पुरस्कारमहाराष्ट्र महिलामुक्तपीठ
Previous Post

मुंबईच्या जिया रायची कमाल, विक्रमी वेळेत केली पाल्कची सामुद्रधुनी पार!

Next Post

भारतातील विमानतळावर संरक्षणासाठी ‘या’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Next Post
airport

भारतातील विमानतळावर संरक्षणासाठी ‘या’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!